5 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 36 वर्षानंतरही गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच मनाला मिळतो सुकून

90 च्या दशकातील सर्वात रोमँटिक लोकप्रिय गाणं. जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. ऐकताच लोक गुनगुनतात. आजही लाखो चाहत्यांचं आवडतं.

| Updated on: May 10, 2026 | 10:29 AM
1 / 5
90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांची ओळख केवळ कथा किंवा कलाकारांमुळेच नाही तर त्यांच्या संगीतामुळेही तयार होत होती. अनेक चित्रपट आजही फक्त त्यांच्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

2 / 5

त्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू इतकी जबरदस्त होती की आजही लाखो लोक ही गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अशाच सदाबहार रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे 'जब कोई बात बिगड़ जाए'. हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या Jurm या चित्रपटातील असून, रिलीज होताच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

3 / 5

तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणं प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. या गाण्याला प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आवाज दिला होता. साधे पण मनाला भिडणारे शब्द आणि सुंदर धून यामुळे हे गाणं लोकांच्या हृदयात घर करून गेलं.

4 / 5

त्या काळात ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं प्रत्येक रेडिओ स्टेशन, पार्टी आणि स्टेज शोची शान बनलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याची साधी मांडणी आणि भावनिक शब्द लोकांना खूप भावले.

5 / 5

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. YouTube, Instagram Reels आणि विविध म्युझिक अॅप्सवर हे गाणं लाखो वेळा ऐकलं जातं. अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्येही हे गाणं वारंवार सादर केलं जातं. विशेष म्हणजे नव्या पिढीतील तरुणांनाही हे गाणं तितकंच आवडतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us