घरोघरी मातीच्या चुलीमधील जानकीचं मॅनर्निटी फोटोशूट, म्हणाली तुम्हीच सांगा काय होणार?
घरोघरी मातीच्या चुलीमधील अभिनेत्रीने केलं खास मॅटर्निटी फोटोशूट. चाहत्यांनाच विचारला प्रश्न. म्हणाली काय होणार सांगा मुलगा की मुलगी?

Image Credit source: Social media
- टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ने काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कुटुंबातील नातेसंबंध, प्रेम, आपुलकी आणि रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटनांवर आधारित या मालिकेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी’ ची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेच्या कथानकात जानकीच्या आयुष्यातील खास टप्पा दाखवण्यात येत असून ती गरोदर असल्याचे पाहायला मिळत आहे.
- याच पार्श्वभूमीवर रेश्माने सोशल मीडियावर खास फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये रेश्मा फिकट सोनेरी रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसत आहे. तिचा साधा आणि मोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
- हे फोटो शेअर करत रेश्माने, ‘काय होणार सांगा, मुलगा की मुलगी?’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. रेश्माच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
- अनेक चाहत्यांनी ‘जानकी’ला शुभेच्छा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे रेश्माचे हे खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Follow Us





