PHOTO | बिहार निवडणुकीचे रंग!, तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडाका
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला विधानसभेच्या ७८ जागांसाठी मतदान पार पडेल. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अररिया मतदारसंघात जाहीर सभा घेत काँग्रेस आणि राजद (RJD)वर जोरदार हल्ला चढवला. डबल युवराज आणि जंगलराज या मुद्द्यांवरुन मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
- भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाही बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात उतरले आहेत. प्रचारसभेदरम्यान खाली उतरुन नड्डा यांनी मतदारांशी संवाद साधला..
- मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही एका प्रचारसभेत हात जोडून मतदारांना जनता दल (संयुक्त) अर्थात JDUच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
- बाबुबरही विधानसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार अमरनाथ प्रसाद यांच्या प्रचारसभेत पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान सहभागी झाले आणि मतदारांना LJP उमेदवारांना निवडणून देण्याचं आवाहन केलं.
- एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बहादुरजंग विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. त्यांनी सत्ताधारी नितीश कुमार आणि विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला.
- बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.






