
सिनेमात अभिनेत अक्षय खन्ना याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. सिनेमात त्याने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबच्या मागे अक्षय खन्ना आहे... हे देखील कळत नाही.

सिनेमातील अक्षय याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेत्याला ओळखणं कठीण झालं आहे. अक्षयने त्याच्या अभिनयाने सर्वांना चकित केलं आहे.

रिपोर्टनुसार, सिनेमासाठी औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्ना याला 2 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अभिनेत्याला मिळालेलं मानधन फार कमी आहे, शिवाय त्याचं स्क्रिन टाईम देखील कमी आहे... असं देखील म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'छावा' सिनेमासाठी विकी कौशल याला 10 कोटी रुपये, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. यांच्या तुलनेत अक्षयला मिळालेलं मानधन फार कमी आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिनेमाने आतापर्यंत देशात 165 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.