
साडीमध्ये अभिनेत्री कंगना यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

साडीत कंगना प्रचंड सुंदर दिसत आहेत. कंगना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. सोशल मीडियावर कंगना कायम नव्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

सध्या फोटोशूटमुळे चर्चेत असलेल्या कंगना त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे अधिक चर्चेत असतात.ज्यामुळे त्यांना वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागतो.

कधी अभिनेत्री सेलिब्रिटींच्या बाजूने बोलते, तर कधी अनेकांना विरोध देखील करते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

कंगना सध्या ‘इमर्जन्सी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमाला अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.