
'बॉर्डर 2' हा चित्रपट येत्या 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजित दोसांज यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटासाठी त्यांना किती मानधन मिळालं, याबद्दलची माहिती समोर आली आहेत.

मानधनाच्या बाबतीत सनी देओल सर्वांच्या पुढे आहे. 'गदर 2'च्या यशानंतर तो 'बॉर्डर 2'मध्ये लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कालरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याला 50 कोटी रुपये फी मिळाल्याचं कळतंय. या चित्रपटात त्याला सर्वाधिक मानधन मिळालं आहे.

या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मेजर होशियार सिंह दहियाची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला आठ ते दहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. वरुणला अशा भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझ या चित्रपटात फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्याने चार ते पाच कोटी रुपये फी स्वीकारली आहे. दिलजीतची संगीत आणि अभिनयाची प्रतिभा या चित्रपटाला पंजाबसह देशभरात पोहोचवण्यास मदत करेल.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या चित्रपटात लेफ्टनंट कमांडर जोसेफ नोरोन्हा यांची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला किती मानधन मिळालं आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु त्याची भूमिका मूळ चित्रपटाशी कनेक्टेड असल्याचं समजतंय.