Summer Vacation : मुलांना सुट्टीमध्ये ‘या’ ठिकाणंवर फिरायला नक्की घेऊन जा, फक्त मजाच नाहीतर शिकायलाही मिळणार!

वागामोन - तुम्ही मुलांना घेऊन केरळमधील वागामोनलाही भेट देऊ शकता. वागामोन हे एक अतिशय सुंदर ऑफबीट हिल स्टेशन आहे. तुम्हाला येथे घनदाट जंगले, चहाचे मळे आणि धबधबे यांची सुंदर दृश्ये आवडतील. तसेच तुम्ही येथे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि रॉक क्लाइंबिंगचाही आनंद घेऊ शकता.
- फिरायला गेलं की तिथे फन एक्टिव्हीटी असतील तर त्याची मजा काही औरच. अशा ठिकाणी लहान मुले या फन एक्टिव्हीटींमध्ये अगदी उत्साहाने भाग घेतातच. पण अशी ठिकाणे शोधायला अनेक पालकांना समस्या येतात. त्यामुळेच आता आपण काही अशा ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन बिनधास्त फिरायला जाऊ शकता.
- महाबळेश्वर – महाबळेश्वर हे अनेक लोकांचे फेवरेट ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक आकर्षक आणि सुंदर असे हिल स्टेशन आहेत. गरमीच्या दिवसात तुम्ही येथे जाच कारण येथील हवामान थंड आणि अतिशय आल्हाददायक आहे. तुम्ही येथे फिरायला गेल्यावर सनसेट, सुंदर हिरवळ, स्ट्रॉबेरीची शेती, घोडेस्वारी, बोटिंग आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे महाबळेश्वरला तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आवर्जून जा.
- गंगटोक – तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन गंगटोकला जाऊ शकता. गंगटोकला तुम्ही बौद्ध मठाला भेट देऊ शकता. तसेच तेथील समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकता, ज्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल, त्या ठिकाणाची माहिती त्यांना समजेल. तसेच तुम्ही तिथे केबल कार राइड्सचाही आनंद घेऊ शकता.
- वागामोन – तुम्ही मुलांना घेऊन केरळमधील वागामोनलाही भेट देऊ शकता. वागामोन हे एक अतिशय सुंदर ऑफबीट हिल स्टेशन आहे. तुम्हाला येथे घनदाट जंगले, चहाचे मळे आणि धबधबे यांची सुंदर दृश्ये आवडतील. तसेच तुम्ही येथे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि रॉक क्लाइंबिंगचाही आनंद घेऊ शकता.
- चिकमंगलूर – चिकमंगलूर हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. येथे आकर्षक कॉफीचे मळे प्रसिद्ध आहेत. तसेच येथील धबधबे, ऐतिहासिक मंदिरे आणि हिरवीगार दृश्ये तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन चिकमंगलूरला अगदी बिनधास्तपणे फिरायला घेऊन जाऊ शकता.





