किती रोमँटिक दिसतेय.., अभिनेत्रीच्या लाल ड्रेसमधील फोटोंवर चाहते फिदा, सौंदर्य पाहून…

मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने तिचे पावसात भिजतानाचे लाल रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 4:45 PM
1 / 5
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत सोयराबाईंची दमदार भूमिका साकारत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली. आपल्या प्रभावी अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेली स्नेहलता सध्या तिच्या एका खास पावसाळी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

स्नेहलताने पावसाळी वातावरणाचा आनंद घेत एका इमारतीच्या गच्चीवर खास फोटोशूट केले आहे. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये तिचा बिनधास्त अंदाज या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

3 / 5

या फोटोशूटसाठी तिने लाल रंगाचा आकर्षक कुर्ता-प्लाझो सेट परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत स्नेहलताने सुंदर झुमके, हातातील अंगठी आणि कपाळावरील टिकलीने खास टच दिला आहे.

4 / 5

पावसाच्या सरींमध्ये विविध पोझ देताना स्नेहलताचा उत्साही आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना विशेष पसंत पडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले असून चाहत्यांकडून कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या लूकचे भरभरून कौतुक केले जात आहे.

5 / 5

मालिकेतील गंभीर आणि दमदार भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्नेहलताचा हा हटके आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांसाठी निश्चितच सुखद धक्का ठरला आहे. अभिनयासोबतच आपल्या स्टायलिश अंदाजानेही ती सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us