माझ्यासोबत रात्र घालव…, बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनाच नाही, ‘या’ अभिनेत्यांना आलेत घाणेरडे अनुभव
बॉलिवूडचं ग्लॅमरस विश्व बाहेरून फार आकर्षक वाटतं. पण पडद्यामागचं सत्य समोर आल्यानंतर मोठा धक्का बसतो. इथे काम करण्यासाठी तुम्हाला काही तडजोड करावी लागते.... असं अनेक सेलिब्रिटींनी सांगितलं आहेय. या गोष्टींचे सत्य तेव्हाच उघड होतं जेव्हा स्टार्स त्यांचे अनुभव शेअर करतात.

फाईल फोटो
- अभिनेत्री कंगना राणौत यांना देखील करीयरच्या सुरुवातीला वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. लीड अभिनेत्रीची भूमिका करायची असेल तर, अभिनेत्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील… असा खुलासा अभिनेत्रीने केलेला.
- अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एकदा खुलासा केला होता की एका निर्मात्याने एकदा त्यांना सांगितलं होतं की, जर त्यांनी त्याच्यासोबत रात्र घालवली तरच त्यांनी चित्रपटात भूमिका मिळेल. नीना गुप्ता स्वतःवर झालेल्या अत्याचाराबद्दल अनेकदा बोलल्या आहेत.
- रणवीर सिंगने खुलासा केलेला, सिनेमाच्याच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला. त्याला सेटवर अशा घटनांना अनेकदा सामोरं जावं लागलं आहे. एकदा तर कास्टिंग डायरेक्टरने त्याला त्रास देण्याचा प्रयत्नही केला होता.
- अभिनेता सलमान खान स्टारर ‘वीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी झरीन हिला देखील वाईट अनुभव आलेला. झरीन खानने खुलासा केलेला की, दिग्दर्शक तिला वारंवार चुंबन दृश्ये करण्यास सांगत होते. सेटवर तिला अनेक वेळा त्रास देण्यात आला होता.
- अभिनेत्री राधिका आपटेने खुलासा केलेला की, तिला दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या अटी मान्य न केल्यामुळे तिला बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स गमवाव्या लागल्या. पण राधिकाने मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्थान पक्क केलं.





