Photo | पंकज अडवाणी लग्नाच्या बेडीत, सानियासोबत घेतल्या साताजन्माच्या आणाभाका!

भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीने बुधवारी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:17 PM, 7 Jan 2021
1/6
Pankaj Advani
भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीने बुधवारी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. पंकजने 6 जानेवारीला गर्लफ्रेंड सानिया शदादपुरीशी लग्न केले.
2/6
Pankaj Advani
पंकज आणि सानियाच्या लग्नापूर्वी मंगळवारी एक संगीत कार्यक्रम पार पडला होता, ज्यात घरचे, जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. हा फोटो शेअर करून पंकजने मंगळवारी सानियासोबत लग्न करत असल्याची माहिती दिली.
3/6
Pankaj Advani 2
पंकज आणि सानिया यांनी हा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या लग्नाची घोषणा केली. सानिया एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिने शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरसोबत देखील काम केले आहे.
4/6
Pankaj Advani 4
35 वर्षीय पंकज अडवाणी हे भारतातील सर्वात यशस्वी बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू आहे. त्याने 23 वेगवेगळ्या आयबीएसएफ बिलियर्ड्स आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपद जिंकले आहे.
5/6
Pankaj Advani 3
बिलियर्ड्सपासून त्याने आपली कारकीर्दीची सुरुवात केली होती. पंकज अडवाणीला 2005 आणि 2006 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
6/6
Pankaj Advani
2018 मध्ये पंकज यांना देशाचा तिसरा सर्वोच्च मानाचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.