केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी पेटून उठले आहेत. या कायद्यांविरोधातील आंदोलनाचा त्यांचा सातवा दिवस आहे. मात्र अजूनही सरकार आणि आंदोलकांना मान्य होईल असा तोडगा निघालेला नाही.
सिंधू बॉर्डवर शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आहेत. या आंदोलनादरम्यान शेतकरी अशा प्रकारे आराम करत आहेत.
नवी दिल्लीतील सिंधू सीमेवर आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली विसावा घेतला.
सिंधू बॉर्डरवर सुरु असलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे स्वयंपाक तयार केला जात आहे.
सिंधू बॉर्डरवर सहा ते आठ शेतकरी आपल्या सहकारी शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे स्वयंपाक करत आहेत.