PHOTO | दिल्लीत ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, हवा प्रदूषणाला टॅकल करण्याचा प्रयत्न
या वेळी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करताना नागरिकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. आजपासून या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असल्याचेही ते म्हणाले.

या मोहिमेविषयी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडून जनजागृती करण्यात आली.
- देशात प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली आघाडीवर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
- या पार्श्वभूमीवर वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवता यावे म्हणून दिल्ली सरकार वेगवेगळ्या योजना, मोहिमा राबवत आहे.
- दिल्ली सरकारकडून ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ ही मोहीम राबली जात आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 21 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत राबवला गेला.
- सोमवारपासून दिल्लीमध्ये ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली.
- या मोहिमेविषयी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडून जनजागृती करण्यात आली.
- या मोहिमेंतर्गत सिग्नलवरील रेड लाईट लागताच गाडीचे ईंजीन बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. गाडीचे इंजीन बंद केल्याने कार्बन डायऑक्साईड या विषारी वायूचे उत्सर्जन कमी होईल. परिणामी हवा प्रदूषणावर आळा बसेल, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
- या वेळी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करताना नागरिकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. आजपासून या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असल्याचेही ते म्हणाले.







