मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबई ही ७ बेटांपासून तयार झाली होती. मुंबईतील खाडी आणि दलदलीत भराव टाकून आजची मुंबई तयार करण्यात आली. मुंबईत फोर्ट भागात ब्रिटीशांचा किल्ला होता, आजही या किल्ल्याचे अवशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या जवळ असलेल्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या मागे आहेत.तेव्हाची मुंबई कशी होती हे पाहूयात...

ब्रिटीशकाळात मुंबई हे बेट पोर्तुगिजांनी ब्रिटनचे राजपूत्राला लग्नाची भेट ( हुंडा ) म्हणून दिले होते. साल १६६१ मध्ये ब्रिटनचा राजा 'दुसरा चार्ल्स' (King Charles II) आणि पोर्तुगीज राजकन्या 'कॅथरीन ऑफ ब्रागांझा' (Catherine of Braganza) यांचा विवाह झाला होता.

पोर्तुगिज राजकन्येच्या लग्नात पोर्तुगीज सरकारने मुंबईची ७ बेटे ब्रिटनच्या राजाला हुंडा (Dowry) म्हणून भेट दिली.

त्यावेळेची मुंबई ही दलदलीची आणि मलेरिया आजारने ग्रस्त होते. राजा चार्ल्स दुसरा याला मुंबईत राज्यकारभार करणे कठीण वाटले.त्याने २७ मार्च १६६८ रोजी हे बेट 'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला' वार्षिक १० पौंड भाड्याने दिले.

ईस्ट इंडिया कंपनी या बेटाचे महत्व ओळखले आणि सुरत येथून आपले मुख्यालय मुंबईत हलवले. त्यानंतर कंपनीने भरतीची भरभरण (land reclamation) करून ७ बेटांना एकत्र जोडले आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित केले.

मुंबईत दादर नावाचे गाव नव्हतेच माहिम आणि परळ या बेटांना जोडण्यासाठी पायऱ्या ( जिना - दादर ) बांधल्या त्यावरुन दादर हे नाव पडले. मुंबईत उद्योग वाढावेत यासाठी कंपनीने करामध्ये सवलती दिल्यामुळे सुरत, गुजरात आणि इतर भागातले व्यापारी मुंबईत स्थायिक झाले.