Snake Fact: साप खरोखरच पुंगीच्या तालावर नाचतात का? सत्य वाचून धक्का बसेल
साप समोर दिसताच अनेकांच्या काळजात धडकी भरते. कारण साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. सापाने चावा घेतल्यास अनेकांचे डोळे पांढरे होतात. आज आपण सापांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

- साप हा धोकादायक प्राणी आहे. तुम्ही सापांबद्दल एक माहिती वाचली असेल की साप पुंगीसमोर नाचतात. मात्र यामागील सत्य काहीसे वेगळे आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- गारुडी पुंगी वाजवत असताना साप डोलताना तुम्ही पाहिलेला असेल. पण साप खरोखर पुंगीच्या तालावर नाचतात का? आज, आम्ही तुम्हाला याबाबत घक्कादायक माहिती सांगणार आहोत.
- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सापांना कान नसतात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर सापांना कान नसतील तर ते पुंगीचा आवाज कसा ऐकतात आणि त्यावर प्रतिक्रिया कशी देतात?
- याचे उत्तर म्हणजे पुंगीमध्ये काचेचे तुकडे जडलेले असतात. या काचेतून निघणारी चमक पाहून साप हालचाल करतात. या प्रकाशामुळे त्यांना धोका जाणवतो आणि त्यामुळे ते प्रकाशाचा अंदाज घेत हालचाल करतात.
- अनेकदा साप आपल्याला पुंगीसमोर उभा राहिलेला दिसतो, ही सापाची बचावात्मक मुद्रा असते. खरतर साप संधी मिळताच या धोक्यातून दूर पळण्याच्या प्रयत्नात असतो.





