Tilak Varma : ‘मी म्हटलं ओके, तू शांत राहा’, हार्दिक मैदानात जे बोलला त्याबद्दल तिलककडून खुलासा, गुजरात विरुद्धच्या त्या वादळी शतकाचं सत्य

Tilak Varma : सोमवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये हार्दिक आणि तिलक वर्मामध्ये मैदानात काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर तिलक वादळासारखा गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडला.

| Updated on: Apr 22, 2026 | 2:32 PM
1 / 5
विजयासाठी चाचपडणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल 2026 च्या सीजनमधील सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सने 99 धावांनी पराभव केला. या विजयात सर्वात मोलाचं योगदान दिलं ते तिलक वर्माने.  Getty Images

विजयासाठी चाचपडणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल 2026 च्या सीजनमधील सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सने 99 धावांनी पराभव केला. या विजयात सर्वात मोलाचं योगदान दिलं ते तिलक वर्माने. Getty Images

2 / 5

तिलक वर्माची मैदानावर बॅट अशी काही तळपली की सगळेच हैराण झाले. खरं म्हणजे तिलकने स्लो स्टार्ट केली होती. एका स्टेजवर तो 22 चेंडूत 19 धावांवर खेळत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत त्याचं बोलणं झालं. यावेळी हार्दिक त्याला असं काही बोलला की, तिलक अंगात वादळ आल्यासारखा खेळला. Getty Images

3 / 5

मैदानात हार्दिकशी काय बोलणं झालं? त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. त्या बद्दल तिलकने सांगितलं. तिलकने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात आठ फोर आणि सात सिक्स होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने पाच बाद 199 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. Getty Images

4 / 5

"तुम्हाला माहितीय हार्दिक कसा आहे ते. त्याच्यात नेहमी जोश भरलेला असतो. मी खूप शांत आणि रिलॅक्स होतो. तो मला प्रोत्साहन देत होता, तू करु शकतोस. तू जिंकू शकतोस" असं तिलक वर्माने सांगितलं. Getty Images

5 / 5

"मी म्हटलं ओके, शांत राहा. फक्त बघ. मी टीमसाठी करुन दाखवतो" त्यानंतर तिलकने त्याचे शब्द खरे करुन दाखवले. गुजरातच्या गोलंदाजांना झोडून काढलं. सामना संपल्यानंतर तिलक वर्माने दोघांमध्ये जे बोलणं झालं, त्या बद्दल हा खुलासा केला. Getty Images

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us