PM Kisan चा हप्ता विसरून जा, Farmer ID तयार झाला का?

PM Kisan Yojana 22th Instalment Farmer ID: पीएम किसान योजनेसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण या योजनेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे पुढील हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

| Updated on: Jan 03, 2026 | 5:01 PM
1 / 6
पीएम किसान योजना ही लोकप्रिय योजना आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेत वार्षिक 6 हजार रुपये थेट खात्यात जमा करण्यात येतात. डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा होते. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी लागते. तर आता या योजनेसाठी Farmer ID ची पण गरज आहे.

2 / 6
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत  21 हप्ते जमा करण्यात आले आहे. आता येत्या दोन महिन्यात पुढील  22 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल. पण यासाठी केंद्र सरकारने एक अट घातली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना फार्मर आयडी सादर केल्याशिवाय या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही.

3 / 6
शेतकरी योजनेत बोगस लाभार्थी ओळखता यावे आणि त्यांना योजनेच्या बाहेर करण्यात यावे यासाठी ईकेवायसी आणि फार्मर आयडीची सक्ती करण्यात येत आहे. फार्मर आयडी, शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करणे ही सोपी पद्धत आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल आहे.

4 / 6
फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जतन करुन ठेवण्यात येते. शेतकऱ्यांची जमीन कोणत्या दिशेला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे. सध्या शेतकऱ्याच्या शेतात कोणते पीक आहे. वर्षभरात तो कोणत्या पिकाची लागवड करतो याची माहिती फार्मर आयडीत असते. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळत असल्याची सरकारला खात्री पटेल.

5 / 6
फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी  AgriStack Portal ला भेट द्यावी. याठिकाणी युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा. अटी आणि शर्तीसह फॉर्म सबमिट करावा. यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.तो सबमिट करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.

6 / 6
शेतकऱ्यांनी आता नवीन पासवर्ड तयार करावा आणि तो सेव्ह करावा. या नवीन आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करा. त्यानंतर Farmer Type मध्ये Owner निवडा. यानंतर Fetch Land Detail वर क्लिक करा आता जमिनीचा खासरा क्रमांक आणि जमिनीची इतर माहिती नोंदवा.