CT 2025 : विजेतेपदानंतर जखमी पाकिस्तानबद्दल भारतातील एका दिग्गज खेळाडूच मोठं वक्तव्य
CT 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे होतं. टीम इंडियाने आपले सर्व सामने दुबईत खेळले. फायनलही दुबईत खेळून जिंकली. यजमान असून पाकिस्तानची अशी अवस्था होती. आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूने जखमी पाकिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

Team India Image Credit source: PTI
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आली. पण या टुर्नामेंटचा अंतिम सामना दुबईत झाला. त्याचं कारण होतं, टीम इंडियाने पाकिस्तानात खेळायला दिलेला नकार. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले.
- टीम इंडिया फायनलमध्ये नसती, तर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानच्या लाहोर शहरात होणार होती. पाकिस्तानच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना फायनल लाहोरमध्येच होणार असा विश्वास होता. पण टीम इंडियाने त्यांचा हा विश्वास धुळीस मिळवला.
- टीम इंडियाने काल दिमाखात तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकली आणि T20 वर्ल्ड कप नंतर सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला. टीम इंडियाच हे यश पाकिस्तानला खुपणार आहे.
- कारण पाकिस्तान यजमान देश असून चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल त्यांच्या देशात झाली नाही, नंतर पाकिस्तानची स्वत:ची टीम साखळी फेरीतच स्पर्धेतून बाद झाली. पाकिस्तानसाठी डबल झटका होता. कारण यजमान असून फायनल त्यांच्यादेशात नाही, वरती स्वत:चा संघ सेमीफायनल पर्यंत सुद्धा पोहोचू शकला नाही. (ICC via Getty Images)
- टीम इंडियाने काल न्यूझीलंडला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफीच विजेतेपद मिळवल्यानंतर माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने मोठं वक्तव्य केलं आहे. अजय जाडेजला टीम इंडियाला पाकिस्तानात फायनल जिंकताना पहायचं होतं. फायनल टीम इंडियाने लाहोरमध्ये जिंकली असती, तर अजून चांगलं झालं असतं असं अजय जाडेजा म्हणाला.