23 वर्षीय मॉडेलचा गळा चिरून खून, सिमी चौधरीच्या हत्येनं खळबळ!
सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका 23 वर्षीय मॉडेलसोबत भयंकर घटना घडली आहे. तिचा गळा चिरून तिला ठार करण्यात आलंय.

simmy chaudhary murder
- आयुष्यात खूप मोठं नाव कमवायचं स्वप्न घेऊन मॉडेलींगच्या विश्वात उतरलेल्या एका 23 वर्षीय मॉडेलची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या मॉडेलचे नाव शीतल चौधरी उर्फ सिम्मी चौधरी असं आहे. हरियाणातील सोनिपतमधील एका ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे.
- शीतलच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार ती बऱ्याच दिवसापासून बेपत्ता होती. पोलिसात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 14 जून रोजी ती अहर या गावात शूटिंगसाठी गेली होती. त्यानंतर ती परतलीच नाही. ती पानीपतमधील माजरा या गावातील रहिवासी होती.
- मिळालेल्या माहितीनुसार ती एक म्यूझिक व्हिडीओ शूट करायला गेली होती. तिचा मित्र सुनिलने शूटिंगच्या ठिकाणी तिला मारलं होतं. त्यानंत शीतलचा फोन बंद झाला आणि आता तिच्या हत्येची माहिती आली आहे.
- दरम्यान, शेवटपर्यंत शीतलसोबत असणाऱ्या तिच्या मित्राला आता पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याच्याशी चौकशी करत आहेत. पण तो कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाहीये. पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत शीतल विवाहित होती. सध्या तिचा आणि तिच्या पतीचा वाद चालू होता. शीतलला एक पाच महिन्यांचं मूलही आहे.