Amitabh – Jaya Bachchan : जया बच्चन वेळेत रेडी व्हाव्यात यासाठी अमिताभ बच्चन यांची भन्नाट युक्ती; किस्सा ऐकताच तुम्हीही खुदकन हसाल
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 5 दशकांपेक्षा अधिक काळ झालाय. त्यांचे किस्से लोकं आजही आवडीने ऐकतात. कौन बनेगा करोडपतीच्यामंचावर अमिताभ हे बऱ्याचदा जया यांचा उल्लेख करतात, तेव्हा लोक ते उत्सुकतेने ऐकत असतात. जया वेळेवर तयार व्हाव्यात यासाठी अमिताभ काय करतात, तो किस्सा खुद्द बिग बी यांनीच सांगितला..

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे कपल म्हणजे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक. त्यांच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आजही त्यांच्या नात्यातील प्रेम कायम आहे. तसंच त्या दोघांचं गमतीशीर नोकझोक आणि खास बॉन्डिंग चाहत्यांना भावतं. अमिताभ बच्चन जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर जया यांचा उल्लेख करतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कधी प्रेमळ आठवणी समोर येतात, तर कधी पती-पत्नीच्या नात्यातील गमतीदार किस्से ऐकायला मिळतात. अलीकडेच KBCच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी संबंधित असाच एक मजेदार किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून कार्यक्रमातील उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही. (All Photos : Social Media)
KBCच्या अलीकडील भागात स्पर्धक विजय लक्ष्मी यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याबद्दल एक मजेशीर प्रश्न विचारला. एखाद्या लग्नसमारंभाला किंवा कार्यक्रमाला जाण्यासाठी जया या तयार होण्याची वाट कधी पाहावी लागते का, असा प्रश्न त्यांनी बिग बी यांना विचारला.
यावर अमिताभ यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील अंदाजात उत्तर दिलं. ते म्हणाले, जर एखाद्या कार्यक्रमाला संध्याकाळी 6 वाजता पोहोचायचं असेल, तर मी जयाला सांगतो की वरात 5 वाजताच येणार आहे. अमिताभ यांचं हे बोलणं ऐकल्यावर जया बच्चन लवकर आवरायला घेतात. त्यामुळे त्या साधारण 3.30 ते 4 च्या सुमारास तयार होण्यास सुरुवात करतात आणि दोघेही वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतात, असं पुढे त्यांनू नमूद केलं.
अमिताभ यांचा हा किस्सा ऐकून KBCच्या मंचावर एकच हशा पिकला. त्यांच्या या मजेदार युक्तीने पुन्हा एकदा हेच दाखवून दिलं की, इतकी वर्षे संसार करूनही अमिताभ आणि जया यांच्या नात्यातील गंमत, नोकझोक आणि आपुलकी आजही कायम आहे.
अमिताभ बच्चन यांनी KBCमध्ये याआधीही जया यांच्याशी संबंधित अनेक रंजक किस्से सांगितले होते. एका भागात एका स्पर्धकाच्या लांब केसांचे कौतुक सुरू असताना अमिताभ यांनी आपल्या लग्नाशी संबंधित एक मजेदार आठवण सांगितली होती. जया यांचे केस खूप लांब होते आणि त्यांच्या याच गोष्टीने अमिताभ यांना आकर्षित केले होते, असे त्यांनी मिश्कीलपणे नमूद केलं.
अमिताभ यांनी आणखी एका प्रसंगी जया यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. कामात बिझी असल्यामुळे अनेकदा बिग बींना जया यांचा फोन उचलता येत नसे. म्हणून त्यांनी आपल्या सेक्रेटरीला जया यांचा फोन उचलून आपली माहिती द्यायला सांगितली. पण जया यांना ते काही आवडलं नाही. “आता तुमच्याशी बोलण्यासाठी मला तुमच्या सेक्रेटरीमार्फत जावे लागणार आहे का?” असा थेट सवाल जया यांनी विचारल्याचं अमिताभ यांनी सांगितलं. जया यांच्या या प्रश्नाचा किस्साही KBCच्या मंचावर चांगलाच चर्चेत आला आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.
तर आणखी एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी विवाहित पुरुषांना मजेशीर सल्लाही दिला होता. जया यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी मिश्कील अंदाजात सांगितलं होतं की, पत्नीचे म्हणणे गप्प राहून ऐकून घेणंच चांगलं असतं ! अमिताभ बच्चन यांचा हा विनोदी अंदाज आणि जया यांच्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी यामुळे प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजन होतं.