
अंडी : अंडी खाण्याचा प्रमुख फायदा म्हणजे अंडी खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले राहाते, तुम्हाला जास्त काळापर्यंत भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता. जास्त अन्नाचे सेवन न केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहाते. तज्ज्ञांच्या मते उकडलेले अंडे शरीरासाठी चांगले असते.

पीनट बटर : रिपोर्ट्सनुसार, पीनट बटर खाल्ल्याने वजन कमी राहण्यास मदत होते. इतकंच नाही तर त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर शरीराला पोषण देतात. तुम्ही नाश्त्यामध्ये ब्राऊन ब्रेडसोबत पीनट बटर खाऊ शकता.

ओटमील : तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर ओटमीलचा नाश्ता तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ओटमीलमध्ये अनेक असे गुणधर्म असताता की जे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर ठेवता, ओटमीलमध्ये थोडासा मध मिसळून ते सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

पोहे : जर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही पोहे देखील काऊ शकता. पोह्यामुळे देखील तुमचे पोट बराच काळ भरलेले राहाते. तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. मात्र पोहे खाताना ते मर्यादीत प्रमाणातच खावेत. अन्यथा इतर काही समस्या उद्भवू शकतात.

व्हेजिटेबल सँडविच : ब्रेडपासून बनवलेल्या सँडविचमध्ये तुम्ही हिरव्या भाज्या मिसळून खाऊ शकता. हा देखील एक उत्तम नाश्ता आहे. व्हेजिटेबल सँडविचमुळे वजन तर वाढतच नाही. सोबतच भाज्यांमध्ये असलेले विविध प्रकारचे पौष्टीक तत्वे तुमच्या शरीराला मिळतात.