Photo | मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी, नगरमधल्या 350 शाळा सुरु

- कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा अखेर आजपासून (23 नोव्हेंबर) सुरु होत आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज अखेर शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली . त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून भरवण्यात येणार आहे.
- अहमदनगरला आजपासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने 9 ते 12 चे वर्ग सुरु करण्यात आलीये.
- नगर जिल्ह्यात नववी ते बारावी मिळून तब्बल 1200 शाळा आहेत. मात्र 350 शाळा आजपासून सुरू होण्याच्या अंदाज आहे.
- तसेच जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार विदयार्थी संख्या असून जिल्ह्यात 10 हजार शिक्षक तसेच 6 कर्मचारी मिळून 16 हजार संख्या आहे.
- विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी सोशल डिस्टन्सिंग, टेंपरेचर चेकिंग, मास्क, सॅनिटाईझरची व्यवस्था करण्यात आलीये.





