Photo : रण माजलं… जरांगेंचं उन्हात उपोषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक; समृद्धी महामार्ग रोखला

Photos : मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळ पासून भर उन्हात बसून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

| Updated on: May 30, 2026 | 10:34 AM
1 / 5
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये भरउन्हात शेतात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये भरउन्हात शेतात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

2 / 5

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निर्णयानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र दिसू लागेल आहे. जालन्यात आंदोलकांनी थेट महामार्ग रोखून धरला आहे.

3 / 5

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतप्त मराठा बांधवांनी जालन्यातील नाव्हा शिवार परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) 'रस्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे.

4 / 5

गेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळ हा रस्ता रोको सुरू असून, आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली आहे.

5 / 5

समृद्धी महामार्ग हा राज्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी आणि आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us