Girija Oak: आम्हा कलाकारांचं खूप नुकसान, गिरीजा ओकसोबतचे फोटो शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले, नॅशनल क्रश म्हणून..

Girija Oak: ‘चिंगी’सारखे चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर समाजाला विचार करायलाही भाग पाडतात. मुलींचं अस्तित्व, त्यांचा सन्मान आणि समानतेचा अधिकार याबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा, हीच मिलिंद गवळी यांची अपेक्षा आहे.

| Updated on: Oct 09, 2026 | 2:30 PM
1 / 7
मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, याच गिरीजा ओकने काही वर्षांपूर्वी एका अतिशय संवेदनशील विषयावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं नाव आहे ‘चिंगी’. आता या चित्रपटाचे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, याच गिरीजा ओकने काही वर्षांपूर्वी एका अतिशय संवेदनशील विषयावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं नाव आहे ‘चिंगी’. आता या चित्रपटाचे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

2 / 7

मुलगी वाचवा, मुलीला शिकवा आणि स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘चिंगी’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटात गिरीजा ओकने गर्भात असलेल्या चिंगीच्या आईची भूमिका साकारली होती, तर मिलिंद गवळी यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यात केला जाणारा भेदभाव, मुलींचं महत्त्व आणि त्यांना समान संधी मिळण्याची गरज या विषयांवर चित्रपट भाष्य करतो.

3 / 7

‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘मुलगी झाली प्रगती झाली’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यांसारख्या घोषणांमधून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला जातो. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यातही मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान संधी मिळायला हवी, असं मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

4 / 7

मुलगा आणि मुलगी यांच्या बुद्धिमत्तेत कोणताही फरक नसतो. योग्य संधी मिळाल्यास मुलीही प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असा महत्त्वाचा मुद्दा मिलिंद गवळी यांनी मांडला आहे. शिक्षण, विज्ञान, अवकाश संशोधन, प्रशासन, क्रीडा आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.

5 / 7

दहावी-बारावीच्या परीक्षांपासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत मुलींची कामगिरी अनेकदा उल्लेखनीय ठरते. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्याचा उल्लेख करत त्यांनी मुलींच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे मुलींना जन्मापासूनच समानतेची वागणूक मिळणं किती महत्त्वाचं आहे, हे ‘चिंगी’सारख्या चित्रपटातून अधोरेखित होतं.

6 / 7

या चित्रपटाची कथा अशोक पाटोळे यांनी लिहिली होती, तर संगीत अशोक पत्की यांचं होतं. राज ईसरानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, अनिता ईसरानी निर्मात्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा महिलांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली होती आणि कथेला चांगला प्रतिसाद दिला होता, अशी आठवण मिलिंद गवळी यांनी सांगितली. मात्र, हा चित्रपट मोजक्या चित्रपटगृहांमध्ये केवळ दोन आठवडे चालला. त्यानंतर तो कोणत्याही दूरचित्रवाणी वाहिनीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला नाही. युट्यूबवरही हा सिनेमा पाहायला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

7 / 7

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी5, सोनीलिव्ह किंवा युट्यूब यांपैकी एखाद्या व्यासपीठावर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. स्त्री सक्षमीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us