AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांच्या निधनानंतर हार्ट अटॅकची पुन्हा चर्चा; तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हार्ट अटॅक बाबतची चिंता वाढली आहे. आपले हृदय फिट आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सोप्य टेस्ट घरीच करता येतात. जाणून घ्या सविस्तर

नाना पाटेकरांच्या निधनानंतर हार्ट अटॅकची पुन्हा चर्चा; तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट
तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 09, 2026 | 3:24 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट, हृदयाचे आरोग्य याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली असूनही आपले हृदय फिट आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसं तर आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी सहसा डॉक्टरांकडे जातात. पण हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची किंवा अनेक उपकरणांची गरज नाही. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या हालचालींद्वारे घरीच हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते. डॉ. नवीन भामारी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हृदय व रक्तवाहिन्यांची सहनशक्ती, स्नायूंची ताकद आणि हृदयाची गती पूर्ववत होण्याची क्षमता यांचे मूल्यांकन तीन टेस्ट द्वारे करता येत असल्याचे सांगितले.

पायऱ्या चढण्याची चाचणी

पहिला निकष फंक्शनल एरोबिक क्षमतेवर फोकस करतो. न थांबता किंवा रेलिंगला न धरता ६० सेकंदात ६० पायऱ्या चढा. या वेगाने चढताना तुमच्या शरीराच्या प्रतिसादाचे परीक्षण केल्याने हृदयाच्या सहनशक्तीचे त्वरित मोजमाप मिळते. डॉक्टर सांगतात की, जर तुम्हाला धाप लागत नसेल, छातीत दुखत नसेल आणि तुम्ही न थांबता चढू शकत असाल, तर तुम्ही एकंदरीत खूप तंदुरुस्त असण्याची शक्यता आहे. खुर्चीवर सिट-अप टेस्ट

दुसरी चाचणी शरीराच्या खालच्या भागाची ताकद आणि फंक्शनल मोबिलीटी तपासते. विशेषतः ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ही टेस्ट उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका साध्या खुर्चीवर बसा आणि दोन्ही हात छातीवर दुमडून ठेवा. खुर्चीच्या हँडलचा आधार न घेता, ४० वर्षांनंतरही तुम्ही न थांबता १६ पेक्षा जास्त वेळा बसू आणि उठू शकत असाल, तर तुमची फिटनेस चांगली असल्याचे संकेत मिळतात. याउलट, १४ पेक्षा कमी वेळा बसण्या-उठण्याची क्रिया पूर्ण होत असेल, तर शारीरिक क्षमता सुधारण्याची गरज असू शकते.

हार्ट रेटची रिकव्हरी

कोणतेही हेवी काम केल्यानंतर वाढलेली हार्ट रेट म्हणजेच हृदयाचे ठोके सामान्य होण्यासाठी किती वेळ लागतो, हे या टेस्टद्वारे तपासले जाते. शारीरिक मेहनतीनंतर शरीराची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम किती चांगल्या प्रकारे पूर्ववत होते, याचे प्राथमिक संकेत या चाचणीतून मिळू शकतात. यासाठी तीन ते पाच मिनिटे धावणे, जिने चढणे किंवा ट्रेडमिलवर चालणे यांसारखा कार्डिओ व्यायाम करा. त्यानंतर लगेच नाडी मोजा आणि एक मिनिट विश्रांती घेऊन पुन्हा नाडी तपासा.

एका मिनिटात हृदयाचे ठोके २५ पेक्षा जास्त कमी झाल्यास रिकव्हरी चांगली असल्याचे संकेत मिळू शकतात. मात्र, ठोक्यांमध्ये १२ पेक्षा कमी घट झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते. मात्र, या आकड्यांचा अर्थ व्यक्तीचे वय, आरोग्य आणि व्यायामाची तीव्रता यांनुसार बदलू शकतो. त्यामुळे केवळ या चाचणीवरून हृदयाच्या आरोग्याचे निदान करू नये.

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....