विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात सापडले दगड, शिक्षणाधिकारी म्हणाले…
सरकार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार दिला जातो. परंतु पोषण आहारात असा प्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होत आहे.

या बाबतीत प्रशासनं आता चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार आहे. Image Credit source: tv9 marathi
- नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता.
- पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये दगडी खडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
- सरकार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार दिला जातो. परंतु पोषण आहारात असा प्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होत आहे.
- या बाबतीत प्रशासनं आता चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार आहे.
- विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार एफसीआय कडून येतो. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणार असून यात जो दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी सांगितले आहे.





