Ajit Pawar | अखेर अजित पवार यांनीच सांगितलं निलेश लंके यांच्या नाराजीच खरं कारण
Ajit Pawar On Nilesh Lanke | अजित पवार यांना आज राजकीय धक्का बसेल अशी चर्चा आहे. त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आज अजित पवार यांनी या विषयावर सूचक वक्तव्य केलय.

Ajit pawar
- निलेश लंकेंच्या नाराजीवर अजित पवार म्हणाले की, “निलेश लंके तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी महायुतीमधल्या एका मंत्र्याबद्दल तक्रार केली. त्यांना काम करताना अडचण येते, त्रास होतो असं त्यांनी सांगितलं”
- निलेश लंकेला मी सांगितलं, “एकदा तू, मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसू. ज्या मंत्र्यांवर नाराजी आहे, त्यांनाही बोलवून घेऊ. काही गैरसमज असतील, तर ते मिटवू, त्यावर तोडगा काढू”
- मी निलेशला सांगितलय, “तू व्यवस्थित राहा. कुठे काही चुकीच करु नको. आता तो राष्ट्रवादीचा आमदार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप लागू आहे. त्याने वेगळ काही केलं, तर राजीनामा देऊन कराव लागेल”
- समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्याने ते असं करत आहेत. एकालाही घेणार नाही, असं बोलून सहा महिने देखील झालेले नाहीत आणि आता लंकेना परत बोलवतायत असं अजित पवार म्हणाले.
- अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.





