50 कोटी खर्चून तयार केलेल्या बारामती बस स्टँडचं आज उद्घाटन; पहिली बस कोणत्या गावी धावणार?

| Updated on: Mar 02, 2024 | 9:17 AM

Inauguration of Baramati bus stand modern facilities : अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त बारामती बस स्टँडचं आज उद्घाटन होणार आहे. हा कसा असेल कार्यक्रम? कोण कोण उपस्थित असणार? कसा असेल कार्यक्रम? पहिली बस कुठून कुठे धावणार? आजच्या कार्यक्रमाची सर्व माहिती. वाचा सविस्तर...

1 / 5
प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती- पुणे | 02 मार्च 2024 : बारामती आणि परिसरातील लोकांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. बारामतीतील नवीन बस स्टँडचं आज उद्घाटन होणार आहे. त्यामुळे बस स्टँड फुलांनी सजवलं आहे.

2 / 5
नवीन अत्याधुनिक सुविधांसह बस स्टँड तयार करण्यात आलं आहे. बारामती ते पुणे या मार्गावर पहिली गाडी सोडली जाणार आहे. तर 50 कोटी खर्चून बस स्टँड तयार करण्यात आलं आहे. या बसस्टँडचं एयरपोर्टसारखं दृश्य आकाशातून दिसत आहे.

3 / 5
 आजच्या या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. तसंच आज नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.

4 / 5
देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी शरद पवारांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. शरद पवार मग देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मग अजित पवार अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.  तर नीलम गोऱ्हे यांच्या शेजारी खासदार सुप्रिया सुळेंचीही आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

5 / 5
उद्घाटन सोहळ्याआधी अजित पवार यांनी बस स्टँडची पाहणी केली. अधिकाऱ्यांना सूचना काही सूचना दिल्या. स्वच्छता ठेवा, मी कधी ही येवून पाहाणी करणार असं अजित पवार म्हणाले. एका स्वच्छता एजन्सीला फोन लावून काम पाहण्याच्या सूचना केल्या आहेत. एवढ सगळं बांधल आहे स्वच्छता नाही अस होता काम नये, अशा शब्दात अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.