AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Schemes: पैसे दुप्पट करायचे? दरमहा कमाई देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या 7 सर्वात जबरदस्त स्कीम

पोस्ट ऑफिसच्या 7 योजनांमधून पैसे दुप्पट करण्यासोबत नियमित मासिक उत्पन्न, सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ मिळवा. अशा कोणत्या. योजना आहेत जाणून घ्या.

| Updated on: Oct 02, 2026 | 11:18 AM
Share
पैसे सुरक्षित ठेवून चांगला परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना बँक FD पेक्षा जास्त आकर्षक ठरतात. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या तिमाहीसाठी सरकारने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. SCSS आणि सुकन्या समृद्धी योजनेवर सर्वाधिक 8.2 टक्के व्याज मिळत असताना, इतर योजनांमध्येही 7 टक्क्यांपुढे परतावा मिळत आहे. पैसे दुप्पट करायचे आहेत का, दरमहा नियमित इन्कम हवी आहे का, मुलीच्या भविष्यासाठी साठवायचे आहेत का की रिटायरमेंटसाठी दीर्घकालीन बचत करायची आहे? गरजेनुसार योग्य योजना निवडणे महत्त्वाचे आहे.

1 / 8
किसान विकास पत्रवर सध्या 7.5 टक्के व्याज मिळते आणि गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत (9 वर्षे 7 महिने) दुप्पट होते. उदाहरणार्थ, 1 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतात. किमान गुंतवणूक 1,000 रुपये असून कमाल मर्यादा नाही. दीर्घकाळासाठी पैसे वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त; मात्र मध्येच पैसे काढायचे असल्यास नियम तपासा.

2 / 8
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर सध्या 7.4% व्याज मिळते व ते दरमहा दिले जाते. 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा सुमारे 617 रुपये मिळू शकतात. कालावधी 5 वर्षे; सिंगल अकाउंटमध्ये कमाल 9 लाख व जॉइंटमध्ये 15 लाख रुपये गुंतवता येतात. मूळ रक्कम सुरक्षित ठेवून नियमित उत्पन्न हवे असेल तर ही योजना फायदेशीर.

3 / 8
ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीमवर सध्या 8.2% व्याज मिळते. 5 वर्षांच्या या योजनेत व्याज दर तिमाहीला दिले जाते. 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक सुमारे 8,200 रुपये (तिमाही 2,050 रुपये) मिळू शकतात. कमाल मर्यादा 30 लाख रुपये. रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न हवे असेल तर ही योजना उत्तम पर्याय.

4 / 8
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवर सध्या 7.1% व्याज मिळते. कालावधी 15 वर्षे, वर्षाला 500 ते 1.5 लाख रुपये जमा करता येतात. टॅक्स सूटसह दीर्घकालीन बचतीसाठी ही योजना उपयुक्त आहे.

5 / 8
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट वर 5 वर्षांसाठी 7.7% व्याज दिले जाते. किमान 1,000 रुपये, कमाल मर्यादा नाही. 1 लाख गुंतवल्यास सुमारे 1.45 लाख मिळू शकतात. टॅक्स बेनिफिट हवे असलेल्यांसाठी आणि 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकणाऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची आहे.

6 / 8
सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यासाठी आहे. यावर 8.2% व्याज मिळते. वर्षाला किमान 250 ते कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात आणि खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी मॅच्युरिटी होते. 5 वर्षांची पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट बँकेच्या FD सारखी असून सध्या 7.5% व्याज देते.

7 / 8
या सातही योजनांचे फायदे वेगवेगळे आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर किंवा पोस्ट ऑफिसमध्ये लेटेस्ट दर आणि नियम नक्की तपासा.

8 / 8
Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा