Photos: ‘हे’ आहे देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन, मिळतात विमानतळासारख्या सुविधा
भारतात एक खाजगी रेल्वे स्टेशन आहे. जिथे विमानतळासारख्या सुविधा मिळतात. या स्टेशनची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात एक खाजगी रेल्वे स्टेशन आहे. जिथे विमानतळासारख्या सुविधा मिळतात. या स्टेशनची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- भारतात रेल्वेवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्व रेल्वे स्टेशन ही सरकारी आहेत. मात्र देशात एक रेल्वे स्टेशन आहे जे खाजगी रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाते.
- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राणी कमलापती रेल्वे स्टेशन आहे जे देशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन पीपीपी मोड अंतर्गत पुनर्विकसित करण्यात आले आहे. हे एक जागतिक दर्जाचे स्टेशन आहे.
- राणी कमलापती रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यात आरामासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- या स्टेशनवर पार्किंग, 24×7 पॉवर बॅकअप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, एसी लॉबी, आधुनिक कार्यालये आणि दुकाने, हाय-स्पीड एस्केलेटर आणि लिफ्ट, ऑटोमोबाईल शोरूम, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल्स आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे.
- राणी कमलापती रेल्वे स्टेशनला ASSOCHAM कडून GEM सस्टेनेबिलिटी प्रमाणपत्रात GEM 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या स्टेशनवर सौर ऊर्जा निर्मितीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.





