
ज्योतिषशास्त्रात केतू हा छाया ग्रह मानला जातो, जो ज्ञान, वैराग्य आणि मोक्षाचा कारक आहे. जानेवारी महिन्यात केतूच्या गोचरीमुळे अनेक राशींवर मोठा प्रभाव पडेल आणि विशेषतः तीन राशींना याचा विशेष लाभ मिळेल. केतूचे हे संक्रमण त्यांना भाग्योदय घडवून आणू शकते. चला, जाणून घेऊया केतूचे संक्रमण नेमके कधी होणार आहे आणि कोणत्या राशींना याचा फायदा होईल.

रविवार, 12 जानेवारी 2026 रोजी रात्री 09:11 वाजता केतू उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रातील केतूच्या भ्रमणामुळे संपत्ती, करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक प्रगती होईल. वृषभ, सिंह आणि वृश्चिक या तीन राशींसाठी हे संक्रमण विशेष भाग्यशाली ठरेल.

केतूच्या नक्षत्र बदलामुळे वृषभ राशीच्या जातकांना शुभ योग जुळतील. नोकरीत बढती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगली प्रगती होईल. नोकरी शोधणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. कौटुंबिक किंवा पैतृक संपत्तीचा लाभ होईल, तसेच जुन्या रखडलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.

केतूच्या या गोचरीचा सिंह राशीला मोठा फायदा होईल. अनपेक्षित धनलाभाची शक्यता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची जबाबदारी किंवा महत्त्वाची भूमिका मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी केतूचे हे भ्रमण अत्यंत लाभदायी ठरेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगती होऊन समाजात आदर मिळेल. जुन्या कर्ज किंवा आर्थिक बोज्यातून मुक्ती मिळण्याची चांगली शक्यता आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)