बांगलादेशला आयसीसीचा मोठा झटका, भारतात आल्याशिवाय गत्यंतर नाहीच.. थेट दिले मोठे आदेश
बांगलादेश गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू असून हिंदू लोकांवर अत्याचार केली जात आहेत. आता बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डला आयसीसीने मोठा झटका दिला.

भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला आहे. बांगलादेशातील क्रिकेटरला आयपीएल संघात घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात ज्याप्रकारे हिंदू लोकांवर अत्याचार होत आहेत, त्यानंतर बांगलादेशातील खेळाडूंना आयपीएलमध्ये घेण्यास तीव्र विरोध भारतातून झाला. हेच नाही तर शाहरूख खानवरही लोकांनी टीका केली. शाहरूख खानच्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडू खेळणार होता. ज्यानंतर तणाव वाढला. आयसीसीने टी-20 विश्वचषकाचे ठिकाण बदलण्याची बांगलादेशची मागणी फेटाळून लावली आहे. बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डाने थेट टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नसल्याची भूमिका घेत हे सामने इतरत्र हालवण्याची मागणी केली.
आता आयसीसीने थेट बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला. आयसीसीने स्पष्ट शब्दात बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगितले की, जर तुम्ही टी-20 विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी भारतात गेला नाही तर तुमचे गुण कापले जातील. हा मोठा झटका आयसीसीने दिला. बांगलादेशच्या क्रिकेट संघाला भारतात येऊन क्रिकेट खेळल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आयसीसीने एका व्हर्च्युअल बैठकीदरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाला माहिती दिली की, सुरक्षेच्या कारणांमुळे भारताबाहेर सामने खेळण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात येत आहे.
आयसीसीने सुरक्षेचे कारण देत भारतात सामने खेळावी लागतील स्पष्ट केले. बांगलादेश क्रिकेट बोर्ड श्रीलंकेत सामने घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भारताने बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा थयथयाट बघायला मिळतोय. बीसीसीआयच्या सांगण्यावरून आयपीएल संघ केकेआरने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला करारमुक्त केले.
केकेआरने आयपीएल संघात मुस्तफिझुर रहमान याला घेतले होते. मात्र, होणारा विरोध आणि बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयानंतर मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हेच नाही तर केकेआरसह शाहरूख खान याच्यावरही जोरदार टीका मुस्तफिझुर रहमान याला घेतल्यानंतर करण्यात आली. त्यानंतर टी-20 विश्वचषकही खेळण्यासाठी आम्ही भारतात येणार नसल्याची भूमिका बांगलादेशने घेतली. मात्र, मोठा झटका आयसीसीने बांगलादेशला दिला आहे.
