
रोहित शर्मा याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याला कर्णधार करण्यात आलं. टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Photo Credit: PTI)

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून शुबमन गिल कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. टीम इंडियाच्या या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. (Photo Credit: PTI)

सरावादरम्यान फोटो सेशनही पाहायला मिळालं आहे. शुबमन गिल याने फोटोशूट केलं आहे. शुबमनचं कर्णधार झाल्यानंतरचं हे पहिलंच फोटोशूट आहे. (Photo Credit: Bcci)

बीसीसीआयने शुबमन गिल याचे 4 फोटो एक्स या सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. शुबमन गिल याने या फोटोंमध्ये अनेक पोज दिल्या आहेत. (Photo Credit: Bcci)

शुबमन गिल 2000 नंतरचा टीम इंडियाचा सर्वात युवा कसोटी कर्णधार ठरला आहे. शुबमनची वयाच्या 25 वर्ष 270 व्या दिवशी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. गिलने याबाबतीत महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक केला. धोनीला वयाच्या 26 वर्ष 279 व्या दिवशी टेस्ट कॅप्टन करण्यात आलं होतं. (Photo Credit: Bcci)