Happy Birthday Raveena : रवीनाच्या आयुष्यातील खास गोष्टी, पाहा खास व्यक्तिंचे फोटो
रवीना 2019 मध्ये आजी बनली. ती आपल्या नातवासोबत फोटोसुद्धा शेअर करत असते. (Special things of Raveena's life, pictures of her family)

- बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडन आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टींमुळेसुद्धा नेहमी चर्चेत असते. वयाच्या 46 व्या वर्षीच ती आजी बनली आहे.
- ही गोष्ट मान्य करणे जरा अवघड आहे, मात्र हे खरं आहे. रवीना 2019 मध्ये आजी बनली. ती आपल्या नातवासोबत फोटोसुद्धा शेअर करत असते.
- रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 मध्ये झाला होता. तिनं वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये 11 वर्षीय पूजा आणि 8 वर्षीय छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.
- तिनं या दोन्ही मुलींना सांभाळलं आणि त्यांचं लग्न करुन दिलं. छायानं 2019 मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव रुद्र ठेवण्यात आलं. याच रुद्रसोबत रवीना नेहमी फोटो पोस्ट करत असते.
- 2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशा नावाच्या मुलीला जन्म दिला.
- राशाच्या जन्मानंतर 2008 मध्ये रणवीरवर्धनचा जन्म झाला. ती आपल्या चारही मुलांसोबत नेहमी फोटो शेअर करते.






