Team India : श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आऊट! पंत आणि सिराजला दिली टीम इंडियात संधी

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी 3 जानेवारीला संघाची निवड होणार आहे. यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने संघाची निवड केली आहे. चला जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 02, 2026 | 6:08 PM
1 / 5
न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे  मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी संघात कोणाला स्थान मिळणार आणि कोण आऊट होणार याची उत्सुकता आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी दिग्गज खेळाडू रेसमध्ये आहेत. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांची नावं आहेत. निवडीपूर्वी आकाश चोप्राने आपला संघ निवडला आहे. (फोटो-पीटीआय)

2 / 5
आकाश चोप्राने निवडलेल्या संघात शुबमन गिलचं पुनरागमन झालं आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघ या मालिकेत उतरेल. तसेच अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा यापैकी एकाला निवडण्याचा सल्ला दिला. इतकंच काय तर श्रेयस अय्यरला बाहेर केलं आहे. (फोटो-पीटीआय)

3 / 5
श्रेयस अय्यरचं फिटनेस पाहता त्याला संघात स्थान दिलं नाही. इतकंच काय तर संघात मोहम्मद सिराजला स्थान दिलं आहे. पण मोहम्मद शमीला डावललं आहे. खरं तर सध्याचा शमीचा फॉर्म पाहता संघात स्थान मिळेल अशी चर्चा आहे. (फोटो-पीटीआय)

4 / 5
मोहम्मद सिराजच नाही तर ऋषभ पंतलाही संघात स्थान दिलं आहे. आकाश चोप्राच्या मते वनडे संघात इशान किशनला संधी मिळणार नाही. इतकंच काय श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाडला संघात स्थान दिलं आहे. (फोटो-पीटीआय)

5 / 5
आकाश चोप्राने निवडलेली टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, तिलक वर्मा, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल.(फोटो-पीटीआय)