
आशिया कप 2025 स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघासमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धा होणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. सूर्यावर या स्पर्धेत नेहमीप्रमाणे बॅटिंग आणि कॅप्टन अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. सूर्यासमोर या स्पर्धेत एक मोठं आव्हान आणि संधी आहे. (Photo Credit : PTI)

सूर्याने आतापर्यंत भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. सूर्याच्या बॅटिंग आणि नेतृत्वावर कुणालाच शंका नाही. मात्र सूर्या यंदा तरी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धची कामगिरी सुधारणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Photo Credit : PTI)

सूर्याने अवघ्या काही वर्षांत टी 20i संघातील स्थान निश्चित केलं. सूर्याने आतापर्यंत अनेक संघांविरुद्ध बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र सूर्याला पाकिस्तान विरुद्ध काही खास करता आलेलं नाही. सूर्याने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध 5 टी 20 सामने खेळले आहेत. सूर्याला या 5 सामन्यांमध्ये एकूण 64 धावा करता आल्या आहेत. (Photo Credit : Getty Images)

सूर्याची टी 20 आशिया कप स्पर्धेत खेळण्याची दुसरी वेळ असणार आहे. सूर्या 2022 साली झालेल्या टी 20 आशिया कप स्पर्धेत खेळला होता. तेव्हा सूर्याला फक्त एकूण 31 धावाच करता आल्या होत्या. तसेच तेव्हा सूर्याचा हायस्कोअर हा 18 इतका होता. (Photo Credit : Getty Images)

सूर्याचं आशिया कप स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पण होणार आहे. सूर्या यंदा पाकिस्तानसमोर कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. हा महामुकाबला 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे सूर्यासमोर या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत कॅप्टन आणि फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.त्यामुळे कॅप्टन सूर्या हे आव्हान कसं पेलतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)