क्रिकेट बोर्डाकडून कारवाईचा चाबूक, IPL दरम्यान खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी

Cricket News : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. 24 वर्षीय स्टार बॅट्समनवर 4 सामन्यांची बंदीची कारवाई करण्यात आली आहे.नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

| Updated on: Apr 28, 2025 | 8:10 PM
1 / 6
आयपीएल 2025 दरम्यान बांगलादेश क्रिकेट टीमच्या तॉहिद हृदॉय याच्यावर 4 सामन्यांची बंदी घातली गेली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी याबाबतची माहिती दिली.  तॉहिदने आतापर्यंत बांगलादेशचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये 77 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केवं आहे. तॉहिद सध्या बशुंधरा ढाका प्रीमियर डीव्हीजन क्रिकेट लीग स्पर्धेत मोहमेडन स्पोर्टिंग क्लबचं नेतृत्व करतोय. (Photo Credit :PTI)

2 / 6
क्रिकबझच्या वृत्तानुसार, तॉहिदवर याआधीही एका सामन्याची बंदी घातली गेली होती. त्यानंतर आता तॉहिदला 26 एप्रिलला शेरे ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये गाजी ग्रुप क्रिकेटर्स विरुद्ध डीपीडीसीएल सामन्यादरम्यान आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. (Photo Credit :PTI)

3 / 6
तॉहीदने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पंचांनी तॉहिदवर निर्णयाविरुद्ध असहमती दर्शवल्याचा आरोप लावला. (Photo Credit : PTI)

4 / 6
तॉहीद गेल्या सामन्यात आऊट झाल्यानंतरही मैदानातच उभा राहिला. त्यामुळे पंचांनी तॉहिदची तक्रार केली. मात्र तॉहीदने या तक्रारीवर आपली काहीच चूक नसल्याचं म्हटलं होतं.  (Photo Credit : Icc)

5 / 6
तॉहीदने या तक्रारीविरोधात सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यासाठी तॉहिदने पंचांना ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं होतं. मात्र तॉहिद सुनावणीसाठी पोहचला नाही. त्यानंतर मॅच रेफरीने तॉहिदवर 10 हजार टका (स्थानिक चलन) दंड ठोठावला. तसेच 1 डिमेरिट पॉइंटही दिला. (Photo Credit : Icc)

6 / 6
तॉहिदने याआधीही नियमांचं उल्लंघन केलं होतं. तॉहिदच्या खात्यात आधीच 7 डिमेरिट पॉइंट्स होते. त्यामुळे एकूण 8 डिमेरीट पॉइंट झाले.  त्यामुळे तॉहीदला नियमानुसार 4 सामने खेळता येणार नाही. (Photo Credit : Icc X Account)