ENG vs IND : एजबेस्टनमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत इतर खेळाडूंपासून दूर! कारण काय?

Rishabh Pant ENG vs IND 2nd Test : ऋषभ पंत याने उपकर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध धमाका केला. पंतने दोन्ही डावात शतक करत धमाका केला. पंत आता दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे.

| Updated on: Jul 01, 2025 | 7:15 PM
1 / 5
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळवण्यात येणार आहे.  इंग्लंड या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर इंग्लंडला 2-0 ने आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव केला. या दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याने हटके प्रॅक्टीस केली.  (Photo Credit : PTI)

2 / 5
रेव्ह स्पोर्ट्सनुसार, ऋषभने  एजबेस्टनमध्ये टेनिस बॉलने सराव केला आहे. ऋषभने सेंट्रल पीचजवळ सराव केला.   पंत इथे विकेटकीपिंगची प्रॅक्टीस करत होता. पंतने त्यानंतर 20 मिनिटं ड्यूक बॉलने कॅचिंगची प्रॅक्टीस केली. पंत कॅचिंगची प्रॅक्टीस करत होता तेव्हा तो टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नव्हता. भारताचे इतर खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंगची सराव करत होते. तर इथे पंत त्याच्या खास शैलीत तयारी करत होता. (Photo Credit :  PTI)

3 / 5
"पहिल्या कसोटीतील 2 शतकांचा काहीच अर्थ नाही. कारण भारताचा विजय होऊ शकला नाही", असं  पंतने सरावानंतर म्हटलं. "आमच्यासाठी विजय फार महत्त्वाचा आहे. तसेच दुसर्‍या सामन्यात मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल" असं भारताच्या उपकर्णधाराने म्हटलं. (Photo Credit :  PTI)

4 / 5
ऋषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला होता. पंतने दोन्ही डावात शतक केलं होतं. पंतने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या होत्या. (Photo Credit :  PTI)

5 / 5
ऋषभ पंत याने  एजबेस्टनमध्ये 2022 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात धमाका केला होता. पंतने तेव्हा एका डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक केलं होतं. त्यामुळे पंतकडून यावेळेसही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.  (Photo Credit :  PTI)