
दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 271 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने एक गडी गमवून पूर्ण केलं. यासह भारताने ही वनडे मालिका खिशात घातली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने सावध खेळी केली. त्याने 73 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत 75 धावांची खेळी केली. या खेळीसह रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या पंगतीत बसला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 27 धावा करताच हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या विराट कोहली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

रोहित शर्मा 75 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान 7 चौकार आणि 3 षटकार मारले. 3 षटकारांसह रोहितने वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहितने आतापर्यंत 106 डावांमध्ये 178 षटकार मारले आहेत. यापूर्वी ख्रिस गेलने 146 डावांमध्ये 177 षटकार मारले होते. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

टीम इंडिया पुढील वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका जानेवारी 2026 मध्ये खेळली जाईल. त्यानंतर रोहित शर्मा आता चार पाच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)