
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिल्या कसोटीत 30 धावांनी पराभव केला. तर मालिकेतील दुसरा सामना हा 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. (Photo Credit :PTI)

भारताला ही मालिका गमवायची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील पहिलाच कसोटी सामना असणार आहे. (Photo Credit :PTI)

टीम इंडियावर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतात 1999-2000 साली अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने भारताला 0-2 ने पराभूत केलं होतं. (Photo Credit :PTI)

तसेच भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत शंका आहे. त्यामुळे जर शुबमन दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला तर टीम इंडियासाठी तो मोठा झटका असेल. (Photo Credit :PTI)

दरम्यान गुवाहाटीत दुसर्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आधी लंच आणि त्यानंतर टी ब्रेक होणार आहे. (Photo Credit :PTI)