
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण चक्रीवादळामुळे श्रीलंकेचं झालेलं नुकसान पाहता भारतीय संघ टी20 सामना खेळणार आहे. या पैशातून पीडित लोकांना आणि कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. (फोटो-पीटीआय)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. 'बीसीसीआयने पुढाकार घेतल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा अतिरिक्त टी20 सामना चक्रीवादळातील पीडितांना मदत आणि पुनर्निमाणासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची असेल. या पैशांतून पीडितांना मदत केली जाईल.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'बीसीसीआय डिसेंबर 2025 च्या अखेरीस पैसे उभारण्यासाठी दोन टी20 सामने खेळण्यास तयार होते परंतु ते आयोजित करण्यासाठी वेळ नव्हता, विशेषतः तेव्हा कोणताही प्रसारक उपलब्ध नव्हता.' (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

भारत आणि श्रीलंका यांच्याकडे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमान पद आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना श्रीलंकेत होणार आहे. अन्यथा अंतिम सामना भारतात होईल. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी होतील, तर टी20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होतील. (फोटो- टीव्ही9 हिंदीवरून)