Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचं कमबॅक, बीसीसीआयकडून सामना खेळण्याची परवानगी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यामुळे मैदानात कधी परतणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून होती. अखेर त्याचं मैदानातील कमबॅक ठरलं आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 4:14 PM
1 / 5
श्रेयस अय्यरचं अखेर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन ठरलं आहे. उजव्या हाताचा फलंदाज ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून दोन महिने क्रिकेटच्या मैदानातून दूर होता. अखेर त्याला कमबॅकचा मुहूर्त सापडला आहे. 6 जानेवारीला श्रेयस अय्यर पहिला सामना खेळणार आहे. (Photo- PTI)

2 / 5
श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीत मुंबईसाठी पुढचा सामना खेळणार आहे. त्याला या सामन्यात खेळण्यासाठी बीसीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये अय्यर 10 दिवस होता. त्यात त्याने सर्व टेस्ट पास केल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
श्रेयस अय्यरने 2 जानेवारीला प्रॅक्टिस गेम खेळला. त्यात त्याला कुठेही दुखापत जाणवली नाही. इतकंच काय तर दुसऱ्या ड्रिल्समध्येही भाग घेतला. सामन्यापूर्वी आणि नंतर त्याला कुठेही वेदना जाणवल्या नाहीत. (Photo- PTI)

4 / 5
श्रेयस अय्यर 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याने त्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा मार्ग मोकळा दिसत आहे. न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिकेत त्याची निवड होऊ शकते. त्याला सब्जेक्ट टू फिटनेस अंतर्गत सहभागी केलं जाऊ शकतं. 6 जानेवारी फिटनेस टेस्ट पास केलं तर त्याला संधी मिळू शकते. (Photo- PTI)

5 / 5
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे ऋतुराज गायकवाडचं नुकसान होऊ शकते. त्याच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. जर श्रेयस अय्यर फिट झाला तर ऋतुराज गायकवाडला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. (Photo- PTI)