Harmanpreet Kaur : कॅप्टन हरमनप्रीत कौरला मोठा झटका, चौथ्या विजयानंतर काय झालं?

Smriti Mandhana Broke Harmanpreet Kaur Record: भारताने रविवारी चौथ्या टी 20i सामन्यात श्रीलंकेवर 30 धावांनी मात करत सलग चौथा विजय मिळवला. मात्र या दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा महारेकॉर्ड ब्रेक झाला.

| Updated on: Dec 29, 2025 | 5:40 PM
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने या सामन्यात 80 धावांची खेळी केली. स्मृतीने या खेळीसह काही विक्रम आपल्या नावावर केले. स्मृतीने यासह कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला मोठा झटका दिला. (Photo Credit: PTI)

2 / 5
स्मृती मंधाना हीने या खेळीत 27 धावा करताच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृती डावांच्या हिशोबाने वेगवान 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या. स्मृती 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारी चौथी महिला फलंदाज ठरली. तसेच स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली.  (Photo Credit: PTI)

3 / 5
स्मृतीने चौथ्या टी 20i सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करताना 48 चेंडूत 80 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 3 षटकार लगावत कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला झटका दिला. स्मृतीने हरमनप्रीतचा भारताकडून सर्वाधिक 78 टी 20i षटकारांचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit: PTI)

4 / 5
ताज्या आकडेवारीनुसार, स्मृतीच्या नावावर आता टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 80 षटकार झाले आहेत. स्मृतीने 157 सामन्यांमधील 151 डावांत ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit: PTI)

5 / 5
स्मृतीनंतर आता शफाली वर्मा हीच्याकडे हरमनप्रीत कौरला सर्वाधिक टी 20i षटकाराबाबंत मागे टाकण्याची संधी आहे. शफाली टी 20i क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार लगावणारी तिसरी फलंदाज आहे. शफालीने 94 सामन्यांमधील 93 डावांत 69 षटकार लगावले आहेत. (Photo Credit: PTI)