AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादववर कर्णधारपदाचं दडपण! क्रीडाप्रेमींमध्ये रंगली चर्चा

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा संपल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आली. सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करत असल्याचं दिसतं आहे. कारण 19 पैकी 16 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र सूर्यकुमार यादववर कसलं दडपण आहे का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

| Updated on: Jan 26, 2025 | 8:48 PM
Share
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. बांग्लादेश, दक्षिण अफ्रिकेनंतर इंग्लंडला पराभवाचे तारे दाखवले आहेत. पण सूर्यकुमार यादवचा फॉर्म मात्र गेल्याचं दिसत आहे. मागच्या दहा डावांचा विचार केला तर असंच म्हणावं लागेल.

1 / 5
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून या फॉर्मेटमध्ये निवड करण्यात आली. यानंतर सूर्यकुमार यादवने 12 सामने खेळले. पण त्याच्या फलंदाजीत तशी काही जादू दिसली नाही. 12 डावात त्याच्या फलंदाजीची सरासरी ही 24.50 आहे.

2 / 5
सूर्यकुमार यादवला शेवटच्या 12 डावांत फक्त 242 धावा करता आल्या. 2022 मध्ये 1164 धावा करणाऱ्या सूर्याने 2023 मध्ये 17 डावांमध्ये 773 धावा केल्या होत्या. पण आता 12 डाव खेळूनही सूर्याला 250 आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

3 / 5
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शून्यावर बाद झालेल्या सूर्याने दुसऱ्या सामन्यात फक्त 12 धावा केल्या आणि विकेट दिली. यामुळे सूर्यकुमार यादवने 2025 मध्येही खराब फॉर्मात असल्याचं दिसत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शून्यावर बाद झालेल्या सूर्याने दुसऱ्या सामन्यात फक्त 12 धावा केल्या आणि विकेट दिली. यामुळे सूर्यकुमार यादवने 2025 मध्येही खराब फॉर्मात असल्याचं दिसत आहे.

4 / 5
सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब होण्याचं कारण अतिरिक्त जबाबदारी तर नाही ना, अशी चर्चा आता क्रीडावर्तुळात रंगली आहे. इंग्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांत अपयशी ठरलेला सूर्यकुमार यादव पुढच्या 3 सामन्यात पु्न्हा एकदा जुन्या लयात परतेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.