T20 WC 2026, Super 8: दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमवून भारतीय संघाने नोंदवले नकोसे विक्रम

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात टिम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे सर्वच गणित बिघडलं आहे. असं असताना भारताच्या नावावर काही नकोसे विक्रम रचले गेले आहेत.

| Updated on: Feb 22, 2026 | 11:08 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 111 धावा करू शकला. भारताने हा सामना 76 धावांनी गमावला. त्यामुळे नेट रनरेट हा -3.800 झाला आहे. आता उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.  (Photo: BCCI Twitter)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या आयसीसी स्पर्धेतील विजयाच्या मालिकेला खंड पडला आहे. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिळालेल्या पराभवानंतर आता पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 18 सामन्यानंतर हा पराभव झाला आहे. या दरम्यान भारताने टी20 वर्ल्डकप 2024, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग विजय मिळवला होता. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि भारत आमनेसामने आले होते. यावेळी दक्षिण अफ्रिकेने पराभवाचा वचपा काढला.  टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहता 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडविरूद्ध शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 49 धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर आता भारताने 76 धावांनी पराभवाचं तोंड पाहिलं आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने नेट रनरेटवरही परिणाम झाला आहे. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2019 मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 80 धावांनी पराभव झाला होता. त्या  पराभवानंतर हा भारताचा सर्व टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांनी दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. (Photo: BCCI Twitter)