Maharashtra News LIVE : नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द
Maharashtra News LIVE : गेल्या दोन आठवड्यापासून दमदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने जराशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून थैमान घातले होते. मुंबई, ठाणे, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, विदर्भ आणि उर्वरीत राज्यातील अनेक भागात कोसळधार दिसली. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसले. संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पाच सहा खासदार अस्वस्थ असल्याचे मोठे विधान केले आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने पुण्यनगरी दुमदुमली. टीईटी घोटाळ्यात अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे रेल्वे वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दुरुस्ती आणि इतर कामासाठी डेक्कन क्वीनसह काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
टिन्नू यादव आणि सुभाष यांच्या रिमांडसाठी पोलिसांचा अर्ज
देणगी चोरी प्रकरणात आणखी दोन आरोपींच्या रिमांडसाठी अयोध्या पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये रामाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव यांचा समावेश आहे. या अर्जावर 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
-
नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द
प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द झाले आहे. आतापर्यंत एकूण 4 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे.
-
-
आठ दिवसांच्या अमरनाथ यात्रेत दोन लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला
आठ दिवसांत अमरनाथ यात्रेत दोन लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला आहे. ही यात्रा दोन्ही मार्गांवर होत आहे.
-
रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींची पोलीस कोठडी वाढवली
डोंबिवली रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, मुख्य आरोपी शिंदे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
जयशंकर ओमानमधील भारतीय समुदायाला भेटले
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ओमानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, “आज सकाळी ओमानमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत एक उत्तम संवाद झाला. भारत-ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबतचा त्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. समाजासाठी आणि भारत-ओमान भागीदारीसाठी त्यांनी दिलेल्या अनेक योगदानाबद्दल मी त्यांचे कौतुक केले.”
-
-
आता मुख्यमंत्री महसुल मंत्र्यांना भाडे के टट्टे म्हणणार का ? – काँग्रेसचे नेते सिद्धेश राणे
मीरा- भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप झाला आहे. मेहता यांच्यावर कारवाई करणार असे आश्वासन महसुल मंत्र्यांनी दिले होते. महसूलमंत्र्यांवर आता सरकारविरोधात बोलल्यामुळे ‘भाडे के टट्टे’ आणि पैसे घेऊन बोलल्याचा आरोप करणार ? असा सवाल काँग्रेसचे नेते सिद्धेश राणे यांनी केला आहे.
-
श्रीराम मंदिरात चोरी : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने जळगावात निषेध आंदोलन केले आहे. चिमुकले राम मंदिरासमोर रस्त्यावर बसून काँग्रेसच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केले जात आहे.
-
संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण मिडसांगवीत उत्साहात पार
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले. हरिनामाचा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदा पालखी सोहळ्याचे 427 वे वर्ष असून, चांदीच्या नव्या रथामुळे सोहळ्याचे आकर्षण अधिक वाढले आहे.
-
चंद्रपूरच्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणात अपघात, 4 मजुरांचा मृत्यू
पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. रामगुंडम येथे झालेल्या एका भीषण अपघातात सिंदेवाहीच्या पवना चक गावातील 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 27 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
-
कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करतोय – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करतोय. त्याने शेतकरी श्रीमंत होत नाही. त्याला सावकाराकडे जावू लागू नये म्हणून करतो आहे. विधानसभा निवडणूक पूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, शेतकरी अडचणीत असल्याने हा निर्णय घेतला आहे.’
-
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रसातावात उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या आरोपांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, “पूर्वी सिद्धिविनायक मंदिरातील देणगीपेटी लुटली गेली होती. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-
संत पादुका दर्शन सोहळ्यातील अपहार प्रकरणी किशोर महाराज शिवणीकर यांना अटक
संत पादुका दर्शन सोहळ्यातील अपहार प्रकरणी अखेर किशोर महाराज शिवणीकर यांना अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने किशोर महाराज शिवणीकर यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आयोजनात कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
-
कांदिवली परिसरात जंगलात आढळला तरुणीचा मृतदेह
मुंबईच्या कांदिवली पूर्वमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दामू नगर जंगलात आज दुपारी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
-
सांगलीच्या आटपाडी तालुक्यात दोन गटात राडा
सांगलीच्या आटपाडी तालुक्यात दोन गटात राडा. शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून दोन गटात राडा. शाब्दिक वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
-
भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न
भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न. कायद्यानुसार दोषींना एक लाखाच्या दंडापासून ते मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद मंत्री नरहरी झिरवाळांचे विधान. पक्ष कार्यालयात आमदार अमित झनकांच्या जेवणात माशी आढळली- विकास ठाकरे
-
नवाब मलिकांची पुतणी बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवकपद रद्द
नवाब मलिकांची पुतणी बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवकपद रद्द. मुंबईत अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का, बुशरा मलिकांचं नगरसेवकपद रद्द, आतापर्यंत एकूण 4 नगरसेवक पालिका सभागृहातून बाद. ठाकरे सेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि MIMच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द
-
नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला पोलीस कोठडी
-
आरोपींवर कारवाईसाठी घुले कुटुंबीयांचे ठिय्या आंदोलन
विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासह खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरव सोनवणेंना अटक करावी या मागणीसाठी केज शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आंदोलकांनी तहसील समोरील राष्ट्रीय महामार्गावर दिड तास ठिय्या आंदोलन देखील केले. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
-
जळगावात भेसळयुक्त दूध विक्रीसाठी
जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरा सारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आला आहे. घट्ट झालेल्या दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
सांगलीत जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंची येते काल सायंकाळी पाच एकर शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. शाब्दिक चकमकेचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. दिघचीच्या भर चौकात झालेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावर निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी जमावाला पागवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज ही केला.
-
बोगस बियाण्यांमुळे घात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहे. चिखली तालुक्यात जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेताचे पंचनामा सुरू आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत, त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. तर काहींनी दुबार पेरणी सुरू केली असून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय
-
भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
राज्यात वाढत्या भेसळीच्या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. आमदार प्रकाश सोळंके यांनी भेसळखोरांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करत अशा गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत सरकारची भूमिका विचारली. यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यमान कायद्यानुसार दोषींना एक लाख रुपयांच्या दंडापासून ते मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.
-
लातूर मध्ये आज mpsc चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला
mpsc परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घ्या , या मागणीसाठी लातूर मध्ये आज mpsc चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला..मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. NEET आणि TET परीक्षेचे पेपर फुटल्याने mpsc चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे mpsc च्या सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घ्या अशी मागणी आक्रमकपने करण्यात येते आहे….
-
जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ
बदलत्या वातावरणामुळे जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ. जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण जास्त. लहान बालके आणि वयोवृद्ध नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि गरम पाणी पिण्याचं आवाहन. जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन नाही शिवाय सध्या सुरू असलेला रिमझिम पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्दी ताप खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
-
महापौर सय्यद खान यांच्यावर झालेल्या हल्याच्या प्रयत्नानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
परभणीचे महापौर सय्यद खान यांच्यावर झालेल्या हल्याच्या प्रयत्ना नंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन. संबंधित आरोपी विरोधात कठोर कारवाई करून, घटनेचा सखोल तपास करण्याच्या मागणी साठी काळ्या फिती लावून आंदोलन. आंदोलनाचा महानगरपालिकेतील कामकाजवार मोठा परिणाम
-
ऐरोली-मुलुंड रोडवर मिनी टेम्पोला अचानक आग लागली
ऐरोली-मुलुंड रोडवर धावत्या मालवाहू मिनी टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
-
कॉरिडॉर बाधितांची संत नामदेव पायरी येथे भूसंपादना विरोधात निदर्शने.
कॉरिडॉर बाधितांशी मंत्री चंद्रकांत पाटील , उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी चर्चा करावी.. आमदार नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेत लक्षवेधी. मंत्र्यांशी चर्चा करायला, कॉरिडॉर बाधित तयार. शासनाच्या कॉरिडॉर प्रस्ताव , मोबदल्याच्या सादरीकरणाचा बाधितांकडून निषेध. कॉरिडॉर बाधितांची संत नामदेव पायरी येथे भूसंपादना विरोधात निदर्शने.
-
डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर EMKAY एजन्सीचा इशारा; सुरक्षा मिळाल्याशिवाय काम नाही!
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव सोळंके यांच्यावर झालेल्या मारहाणीनंतर EMKAY एजन्सी आक्रमक झाली आहे. मारहाणग्रस्त सृष्टी बाविस्कर आणि वैभव साळुंखे हे दोन्ही डॉक्टर हे EMKAY एजन्सीमार्फत शास्त्रीनगर रुग्णालयात सेवा बजावत होते. घटनेनंतर एजन्सीच्या कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी काम थांबवले आहे.
-
प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली
आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. लीलावती रुग्णालयात जरांगे पाटील यांच्या मुलाची भेट घेऊन आमदार प्रसाद लाड यांनी तब्येतीची विचारपूर केली.
-
ऐरोली-मुलुंड रोडवर दुर्घटना
ऐरोली-मुलुंड रोडवर धावत्या मालवाहू मिनी टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
-
निदा खानला जामीन देताना कोर्टाने दिला भगवान श्रीकृष्णाचा दाखला
टीसीएस महिला अत्याचार व कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना कोर्टाने दिला भगवान श्रीकृष्णाचा दाखला. नाशिकच्या विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. दोन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या निदा खानला दिलासा. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना आणि सामाजिक कलंक कोणत्याही महिलेसाठी असह्य. कोर्टाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी. बाळाच्या हिताचा विचार करून न्यायालयाने जामीन केला मंजूर.
-
जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना लोक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत
जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना लोक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. कोणी नगरसेवक जाणार नाही. जे जाणार असतील त्यांनी आधी राजीनामा द्यावा. कारण ते मशाल चिन्हावर निवडून आले आहेत असं ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
-
नाशिकमधील आमचा कुठलाही नगरसेवक फुटणार नाही – ठाकरे नगरसेवक
नाशिकमधील ठाकरे सेनेचा कुठलाही नगरसेवक फुटणार नाही. आमचा कुठलाही नगरसेवक कुठेही जाणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेतच रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही बैठक झाली नाही असं नाशिकमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
-
मोशी दुर्घटना प्रकरणात जे चुकीचय त्यावर कारवाई करु – महापौर रवी लांडगे
मोशी दुर्घटना प्रकरणाची माहिती घेऊ चुकीचे वाटत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असं महापौर रवी लांडगे म्हणाले. दुर्देवी घटना आहे. मात्र लवकरात लवकर नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आता सुदैवाने पाऊस नाही म्हणून काम युद्धपातळीवर सुरू आहे. जोरात काम करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना बाहेर काढण्याचे काम महत्वाचे आहे.
-
धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा
धाराशिव जिल्ह्यात पाऊस कमी असल्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. लोहारा तालुक्यातील कानेगाव ,कास्ती,भातागळी , या गावांना जुलै महिन्यात सुद्धा या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 200 विहिरींचे अद्यापही अधिग्रहण सुरूच आहे.
-
मनसे काढणार झाडांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रीट, कारवाई सुरू
राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंट-काँक्रीट टाकल्याने झाडांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेने आता यावर कारवाई सुरू केली आहे.
मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि कार्यकर्त्यांनी कुर्ला-अंधेरी रोडवरील मॅक्सस थिएटर समोर, जरीमरी परिसरातील झाडांच्या बुंध्याभोवती साचले काँक्रीट काढून झाडांना मोकळे करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
-
मोशी येथील भीषण दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू
पुण्यातील मोशी येथील भीषण दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. भावेश मोहन वाणी असे मयत ३४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो घन कचरा प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अँथोनी लारा कंपनीत लेखापाल होता. भावेश यांचे वडील मोहन वाणी व आई शालिनी वाणी दोघेही शिरसोली गावात राहतात, भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तो कुटुंबातील एकुलता एक होता. दीड वर्षापूर्वीच संसार थाटल्यावर तो पुण्यातील निगडी मध्ये स्थायिक झाला होता.
-
भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला, एक मुलगी जखमी
भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात घराचा स्लॅब कोसळला. अचानक घराचा संपूर्ण स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली असून त्यामध्ये एक मुलगी जखमी झाली. घटनास्थळी आपत्कालीन विभाग दाखल झाला असून बचावकार्य सुरू आहे.
-
डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे कोर्टात हजर होणार
डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे कोर्टात हजर होणार. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील वैद्यकीय उपचारानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
-
आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही : सुप्रिया सुळे
शरद पवार गटातील खासदार नाराज असल्याच्या चर्चेनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही. पवारांची राष्ट्रवादी ही विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत नाही. आमचे सर्व खासदार एक कुटुंब म्हणून काम करतो’.
-
सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत वाढ
सांगलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने नदीजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
मोशी दुर्घटनास्थळी प्रकाश आंबेडकर यांची पाहणी
मोशी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे होते. विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली.
-
मुख्यमंत्री फडवणीस आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यात ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे भवानी पेठ येथे रात्री १० वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. तर रात्री १०.२० वाजता तुकोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन निवडुंग विठ्ठल मंदिर येथे घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
-
वेंगुर्ल्यात आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड; आजपासून पाण्याचा विसर्ग होणार
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील धरणाच्या भिंतीला विहिरीकडील भागात मोठे भगदाड पडलं आहे. यामुळे धरणाची भिंत फुटण्याचा धोका निर्माण झालाय. यामुळे आज शुक्रवारपासून या धरणातील पाणी साठ्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आली आहे.
-
आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आज कोर्टासमोर
रुग्णालयातून थेट न्यायालयात! डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आज कोर्टासमोर; पोलीस कोठडी वाढणार की न्यायालयीन कोठडी?” डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज दुपारनंतर कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार. बुधवारी अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्याने म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली होती, मात्र न्यायालयाने आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले.
-
परभणीत भेसळ युक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर
डेअरी वरून आणलेले दूध उकळताचं झाले रबरासारखे घट्ट. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना..रबरा सारखे घट्ट झालेल्या दुधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. भेसळ युक्त दूध विक्रेत्यावर कारवाई करा. नागरिकांची मागणी..
-
जुहू चौपाटी आज पर्यटकांसाठी बंद
मुंबईच्या जुहू चौपाटीवर आज समुद्रात उंच भरती असल्यामुळे चौपाटी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता, संपूर्ण चौपाटीवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. कोणत्याही पर्यटकाला आत जाण्यास मनाई आहे. लाईफगार्ड आणि सुरक्षाकर्मचारी ठिकठिकाणी तैनात आहेत. आज सकाळपासूनच समुद्रात उंच भरतीची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
-
माऊली, माऊलीच्या जय घोषवाक्य दुमदुमून गेली पुण्यनगरी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.. पुण्यातील भवानी पेठ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज मुक्कामी.. सकाळपासूनच पुण्यातील नागरिक आणि वारकरी दर्शनासाठी रांगेत उभे घेत आहेत दर्शन. प्रशासनाकडून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून करण्यात आलीय व्यवस्था
-
आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.
-
बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी
लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 120 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. अनेक कंपन्यांची बियाणे लागवडी नंतर उगवलेलेच नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे आर्थिक फटका बसला आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथेही उन्नती कंपनीच्या बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
-
माऊली, माऊली च्या जय घोषवाक्य दुमदुमून गेली पुण्यनगरी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पुण्यातील भवानी पेठ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज मुक्कामी आहे. सकाळपासूनच पुण्यातील नागरिक आणि वारकरी दर्शनासाठी रांगेत उभे राहत दर्शन घेत आहेत. प्रशासनाकडून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे.
-
फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड टाकली. 3 हजार 500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली. 1 लाख 32 हजार रुपयांचे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकण्यात आले.हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचमहल दूध संघाला पुरवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-
हतनुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 9 पर्जन्यमापन केंद्रांवर मागील 24 तासात एकूण 284.4 मि.मी आणि सरासरी = 31.6 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाल्याची माहिती हतनूर प्रशासनाने दिले आहे सध्या स्थितीत धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे
-
आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले
आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद होता. आज सकाळपासून भाविकांना नियमित दर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सहा तालुक्यांतील शाळाही आजपासून नियमितपणे सुरू होत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे.
-
बोगस बियाणांचा शेतकऱ्यांना मोठा फटका
लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 120 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. अनेक कंपन्यांची बियाणे लागवडी नंतर उगवलेलेच नाही,त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे आर्थिक फटका बसला आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथेही उन्नती कंपनीच्या बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
-
सांगली धरण परिसरात आणि जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णेच्या पाणी पातळीत कमालीची घट
सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत घट झाली असून कृष्णा नदीची पाणी पातळी मध्ये कमालीची घट झाली आहे. रात्री 30 फुटावर गेलेली कृष्णा नदी आता नदीची पाणीपातळी सकाळी 25 फूट 6 इंच झाली आहे. त्यामुळे सांगली कराना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसां पासून पडत असणारा पाऊस यामुळे कृष्णा नदी मध्ये कमालीची वाढ होत होती. काल 30 फुटावर नदीची पाणी पातळी गेली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणीपातळी आता घटू लागली आहे.
-
आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस
आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.
भूस्खलनग्रस्त भागांची पाहणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधून धीर दिला. तसेच एकही शेतकरी किंवा बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे अचूक पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Published On - Jul 10,2026 8:00 AM
