AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai lake water levels : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा? महत्त्वाची अपडेट समोर

mumbai water stock : मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाणीसाठा निम्म्यावर पोहोचला आहे.

Mumbai lake water levels : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा? महत्त्वाची अपडेट समोर
| Updated on: Jul 10, 2026 | 7:44 AM
Share

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सर्व धरणांतील पाणीसाठा 48.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीसाठा निम्म्यावर पोहोचल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची पाणीसाठ्याची क्षमता ही 14,47,363 दक्षलक्ष इतकी आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीसाठा 7,03,260 दक्षलक्ष पर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहोचलाय. मागील आठवड्याभरात कोसलळेल्या पावसामुळे जलाशयांत मोठी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयापैकी विहार आणि तुलसी तलाव हे 100 टक्के भरले आहेत. विहार तलावात 27,698 दक्षलक्ष पाणीसाठा झाला आहे. तर तुलसी तलावात 8,046 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोडक सागर धरणातही पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढत आहे. या धरणात 1,06,566 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकंदरीत मोडक सागर धरण हे तब्बल 82 टक्के भरले आहे. तानसा धरणाताली पाणीसाठा देखील 77.48 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 1,12,413 दक्षलक्ष इतका झाला आहे. भासतसा धरणात 42.६८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या भातसा धरणात 3,06,002 दक्षलक्ष पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा धरणात 61,028 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. मध्य वैतरणा धरणातही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. या धरणात 81,508 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. अप्पर वैतरणा, तानसा आणि मध्य वैतरणा या तिन्ही धरणातील पाणीसाठा 52.05 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 3,61,514 दक्षलक्ष इतकं झालं आहे.

पाणीकपातीचं संकट दूर होणार?

मुंबईला तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तानसा या धरणांतून पाणीसाठा पुरवला जातो. या धरणांतून दिवसांतून दररोज 4,10 दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे वर्षभरात पाण्याची गरज भासवण्यासाठी मुंबईला 14 लाख 47 हजार 363 दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यात आता सातही धरणात पाणीसाठा निम्म्यावर पोहोचलाय. पुढील काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली, तर धरणांत पाण्याच्या पातळीत झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचं संकट लवकरच दूर होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र