IND vs PAK: तिलक वर्मा गौतम गंभीरचा विक्रम मोडणार! तर विराट कोहलीचा विक्रमही रडारवर
IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्यात काही विक्रम रचण्याची आणि मोडण्याची संधी आहे. या सामन्यात तिलक वर्मा गौतम गंभीरचा विक्रम मोडू शकतो. इतकंच काय तर विराट कोहलीचा एक मोठा विक्रम रडारवर असणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुढे निघून जाऊ शकतात. तर तिलकच्या रडारवर गौतम गंभीर, युवराज सिंग विक्रम रडारवर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

पाकिस्तानविरुद्ध तिलक वर्माने 130 धावा केल्या आहेत. आता 10 धावा केल्या गौतम गंभीरचा विक्रम मोडेल. गंभीरच्या नावावर 139 धावा आहेत. 26 धावा केल्या तर युवराज सिंगचा विक्रम मोडेल. पण विराटचा विक्रम मोडणं कठीण आहे. कारण त्याने पाकिस्तानविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये 492 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध 11 टी20 सामने खेळला असून 11 षटकार मारलेत. आता विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. (PHOTO CREDIT- PTI)

विराट कोहलीचा 11 षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी तिलक वर्माला फक्त 5 षटकारांची गरज आहे. जर असं झालं तर पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरेल. तर अशीच संधी अभिषेक शर्मालाही आहे. कारण दोघांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 7 षटकार मारले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने ही माहिती दिली. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध आक्रमक अंदाज कायम ठेवला तर अभिषेक शर्मा हा विक्रम मोडू शकतो. (PHOTO CREDIT- PTI)

दुसरीकडे, तिलक वर्माने आतापर्यंत दोन सामने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. मात्र दोन्ही सामन्यात प्रत्येकी 25 धावा केल्या आहे. मोठी खेळी करण्यास अपयश आलं आहे. आता पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)