AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाच्या अफेअरचं सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून समर्थन! सुनीताला दिलं सडेतोड उत्तर

अभिनेता गोविंदा याच्या अफेअरबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहे. अभिनेत्याच्या नावाची चर्चा को-स्टार कोमल हिच्यासोबत रंगली आहे. दोघांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं. पण सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने गोविंदाचं समर्थन केलं आहे.

गोविंदाच्या अफेअरचं सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून समर्थन! सुनीताला दिलं सडेतोड उत्तर
Govinda
| Updated on: Aug 17, 2026 | 3:00 PM
Share

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून पत्नी सुनीता आहुजा हिच्याकडून होत असलेले आरोप आणि कथित एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयरमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत व्हायरल होत आहेत. अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं. पण बॉलिवूडचा दंबग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने गोविंदाचं समर्थन केलं आहे. सोमी अली हिच्या म्हणण्यानुसार, एखाद्या अभिनेत्याच्या क्षमतेचं मूल्यमापन त्याच्या किंवा त्याच्या सह-कलाकाराच्या वयावरून केलं जाऊ नये; त्याऐवजी त्यांच्या प्रतिभेला आणि प्रोफेशनलिज्मला महत्त्व दिलं पाहिजे.

सोमी अली हिने गोविंदा याच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मोठं कॅप्शन देखील लिहिलं आहे. शिवाय गोविंदा प्रति आदर देखील व्यक्त केला आहे. सोमीने असं देखील सांगितलं की, ‘मी गोविंदाला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यासंबंधी चांगल्या प्रकारे ओळखते. गोविंदा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मी देखील त्याच्यासोबत काम केलं आहे. म्हणून एक विनम्र व्यक्ती मी गोविंदाकडे पाहते.’ सोमी असं देखील म्हणाली की, मी गोविंदा आणि सुनीता यांचा आदर करते.

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

पोस्टमध्ये सोमी असं देखील म्हणाली की, ‘अभिनेत्याची पात्रता कधीच त्याच्या वयानुसार ठरत नाही. अभिनेत्याचं वय किती आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं वय किती आहे. याने काहीही फरक पडत नाही. एका कालाकाराची ओळख त्याचं कौशल्य, प्रोफेशनलिज्म, कामासाठी असलेली उत्सुकता यावर ठरलेली असते.’, सोमी असं देखील म्हणाली की, कालांतराने इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं कमी होतं, अशात त्याच उत्साहाने काम करणं सम्मानाची गोष्ट आहे. कोणत्या कलाकाराला फक्त त्याच्या वयामुळे मत तयार करणं योग्य नाही. प्रत्येक कलाकाराला संधी मिळालीच पाहिजे. असं देखील सोमी अली म्हणाली. असं म्हणत अभिनेत्रीने सुनीताला सडेतोड उत्तर दिलं आहे.

गोविंदा आणि सुनिता यांच्यातील वाद

गेल्या काही महिन्यांपासून सुनीता, गोविंदावर गंभीर आरोप करत आहे. गोविंदा याला कोमल स्वर्णकार हिच्यासोबत स्पॉट करण्यात आल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर गोविंदावर सुनीताने निशाणा साधला. सुनीता त्याला ‘शुगर डॅडी’ देखील म्हणाली. यावर गोविंदा यांने देखील संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. सांगायचं झालं तर, गोविंदा आणि कोमल ‘रुपा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर