
क्रिकेट विश्वात 2025 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. या सरत्या वर्षात अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या निमित्ताने 2025 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात हॅरी ब्रूक याने सर्वाधिक झेल घेतले. ब्रूकने 38 सामन्यांमध्ये 41 झेल घेतले. (Photo Credit : PTI)

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि टी 20i कर्णधार एडन मार्करम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्रक्रमने 27 सामन्यांमध्ये 35 झेल घेतले. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल याने 2025 या वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमधील एकूण 41 सामन्यांमध्ये 34 झेल घेतले. (Photo Credit : Twitter/Blackcaps)

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल चौथ्या स्थानी आहे. मिचेलने 2025 वर्षातील 42 सामन्यांमध्ये 27 कॅचेस घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा या यादीत पाचव्या स्थानी आहे. सलमानने 2025 वर्षातील 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27 झेल घेतले. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारतासाठी 2025 या वर्षात सर्वाधिक झेल घेतले आहेत. विराटने 14 सामन्यांमध्ये 16 घेतले. (Photo Credit : AFP)