Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेत 7 खेळाडू दिसणार नाहीत! टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. मात्र या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईमध्येच खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबीत खेळवण्यात येणार आहेत.

| Updated on: Aug 03, 2025 | 8:16 PM
1 / 8
आशिया कप 2025 स्पर्धेचं 26 जुलैला वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत एकूण 8 संघात 1 ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र या स्पर्धेत 7 खेळाडू खेळताना दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 8
विराट कोहली याने टी 20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत एकूण 429 धावा केल्या. तर यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. मात्र विराटने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo Credit :  PTI)

3 / 8
रोहित शर्मा याने वनडे फॉर्मेटमधील आशिया कप स्पर्धेत 939 धावा केल्या आहेत. मात्र विराटप्रमाणे रोहितने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहितही या स्पर्धेत नाही, हे स्पष्ट आहे. (Photo Credit : (@ImRo45 X Account)

4 / 8
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आशिया कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार की नाही? हा प्रश्न आहे. शमीची फिटनेसमुळे इंग्लंड दौऱ्यात निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे आशिया कपमध्ये शमी असणार की नाही? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)

5 / 8
शमीप्रमाणे जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत प्रश्न आहे. बुमराह इंग्लंड दौऱ्यात लंगडताना दिसला. तसेच वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराह आशिया कप स्पर्धेत बाहेर राहू शकतो. (Photo Credit : PTI)

6 / 8
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम गेल्या काही महिन्यांपासून टी 20i संघापासून दूर आहे. बाबरला गेल्या 3 टी 20i मालिकांमध्ये संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे बाबरला आशिया कपसाठी संधी मिळणं अवघड असल्याचं चित्र आहे. (Photo Credit : PTI)

7 / 8
बाबर आझम प्रमाणे मोहम्मद रिझवान हा देखील टी 20i संघातून बाहेर आहे. रिपोर्ट्सनुसार, रिझवानला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रिझवानला या स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. (Photo Credit : PTI)

8 / 8
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याचं विंडीज विरूद्धच्या मालिकेतून टी 20i संघात कमबॅक झालं. शाहीनच्या या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर त्याला आशिया कप स्पर्धेसाठी संधी द्यायची की नाही? हे निश्चित केलं जाऊ शकतं. (Photo Credit : AFP)